शेवगाव प्रतिनिधी, दि. ०५ : भाजपाचे प्रदेश चिटणीस अरुण मुंढे यांना जळगाव जिल्हा प्रभारी सह शिर्डी, लोकसभा व विधानसभा समन्वयक म्हणून काम पहावे लागणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते व केंद्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत त्या बाबतचे नियुक्ती पत्र देऊन जबाबदारी सोपवली.
लोकसभा व विधानसभा निवडणुका होईपर्यंत शिर्डी लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी यांच्या कडून संघटनात्मक काम करून घेणे, काही नेत्यांचा एकमेकांशी दुरावा असेल तर त्यांची बैठक घेऊन तो दूर करणे, तसेच वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांना प्रेरित करून भारतीय जनता पक्षाची जबाबदारी त्यांना देणे आणि जिल्ह्यामध्ये संपर्क करून, दौरा करून निवडणुका होईपर्यंत लक्ष देऊन तेथील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकतीने काम करणे.
बूथ बांधणी, समित्या नेमणे, सरल ॲप नोंद करणे, असे अनेक कार्यक्रम राबवून घेणे. विविध प्रकारची जबाबदारी समन्वयक म्हणून अरुण मुंढे यांना देण्यात आली आहे.
ReplyReply allForward |