श्रीगणेश शैक्षणिक संकुल साईबाबांच्या भूमीतील शैक्षणिक वटवृक्ष – गणेश दळवी

माजी विद्यार्थी व पालक यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उद्घाटन 

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२३ : श्री गणेश शैक्षणिक संकुल साईबाबांच्या भूमीतील शैक्षणिक वटवृक्ष आहे. या वटवृक्षाच्या सावलीमध्ये अनेक विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य झालेले आहेत आणि हे कार्य साई बाबांच्या श्रद्धा आणि सबुरी प्रमाणे सुरू राहील, असे मत साई आश्रया आश्रमचे संस्थापक गणेश दळवी यांनी व्यक्त केले. श्री गणेश शैक्षणिक संकुलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये ते बोलत होते.

“महाराष्ट्र माझा” या संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनामध्ये व्यासपीठावर रामनाथ चौधरी, डॉ.आर्या पितांबरे, डॉक्टर मैथिली पितांबरे, लायन सुधीर डागा, श्री गणेश संस्थेचे अध्यक्ष प्रा.विजय शेटे, उपाध्यक्ष संदीप चौधरी, सचिव नेमीचंद लोढा, विश्वस्त कामिनी शेटे, भारत शेटे, रवींद्र चौधरी, सुरेश गमे, देविदास दळवी, महावीर शिंगवी, संदीप सोनिमिंडे, पंकज मुथा, योगेश मूनावत, स्वप्निल लोढा, चिराग पटेल, आकाश छाजेड, गणेश कुऱ्हाडे, प्राचार्य रियाज शेख, प्राचार्य रामनाथ पाचोरे, प्राचार्य पंकज खडांगळे, उपप्राचार्य प्रवीण दहे, समन्वयक प्रवीण चाफेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी बापू पुणेकर हे उपस्थित होते.          

पाया भक्कम असेल तर सुबक नक्षीकाम करता येते, अगदी त्याचप्रमाणे विद्यार्थ्याच्या वैयक्तिक जीवनावर कार्य करून शैक्षणिक, मानसिक, शारीरिक व स्वप्नपूर्ती करणारे व्यक्तिमत्त्व श्री गणेश शैक्षणिक संकुलात तयार होते. असे डौलदार, दिमाखदार मत रामनाथ चौधरी यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग करावा. तसेच स्वप्न प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी योग्य कृती करावी असे मत श्री गणेश संकुलाची माजी विद्यार्थिनी डॉ. आर्या पितांबरे हिने व्यक्त केले.

सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे स्मृतीचिन्ह व सन्मानचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर, सामाजिक, सांस्कृतिक, विविध गीतांवर नृत्य करून उपस्थितांची मने जिंकली. स्नेहसंमेलनामध्ये प्राध्यापक विजय शेटे यांनी संस्थेच्या विविध शाखांचा वाढता आलेख सादर केला.

प्राचार्य रियाज शेख यांनी श्री गणेश शैक्षणिक संकुलाचा वार्षिक अहवाल सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सुपेकर, पूजा चांदगुडे, प्रियांका खरात, आकांक्षा होन यांनी तर कार्यक्रमाचे आभार रोहिणी घोरपडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.