भगवान बाबा मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक टाकावेत – मुंडे

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि. ९ : सध्या खडोबानगर मधील भाविकाचे श्रद्धा स्थान असलेल्या भगवान बाबा मंदिर परिसराचे सुशोभिकरण चालू असून  त्यासाठी परिसरात पेव्हिंग ब्लॉक टाकण्यात येत आहेत. मात्र हे काम अर्धवट न करता संपूर्ण परिसरात व्हावे. त्यासाठी गरज पडल्यास वाढीव निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. मात्र या कामात खंड पडू नये. अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मुंडे यांनी केली आहे.

Mypage

        या संदर्भात मुंडे यांनी शेवगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना सविस्तर निवेदन दिले असून  निवेदनात म्हटले आहे की, या कामासाठी उपलब्ध झालेल्या निधीत येथील संपूर्ण परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविता येणार नाहीत. कामाच्या इस्टिमेट मध्ये टेंडर प्रमाणे असलेले कामपूर्ण होईल, असे संबंधित ठेकेदाराचे म्हणणे असल्याने कृपया या कामाच्या पुर्णत्वासाठी अतिरिक निधी उपलब्ध करून सदर काम पूर्ण करावे. निधी उपलब्ध करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा करावा लागत असेल तर सरकार दरबारी त्याची मागणी करावी व हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी विनंती करण्यात आली आहे. 

Mypage