देशाच्या सुपुत्राचे मातृत्व हरपले – स्नेहलता कोल्हे 

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ३० : मातोश्री हिराबेन दामोदरदास मोदी यांच्या निधनाने भारत देशाचे सुपुत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मातृत्व हरपले अशा शब्दात भाजपाच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे यांनी श्रध्दांजली वाहिली. कोपरगांव शहर व तालुका भारतीय जनता पक्ष तसेच संजीवनी उद्योग समुह, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यावतीने शहरातील गुरुद्वारा रोडवरील पक्ष कार्यालयात. स्व. हिराबेन मोदी यांना श्रध्दांजली वाहण्यांत आली त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

  कोल्हे पुढे म्हणाल्या की, २०१४ आणि २०१९ लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे नेतृत्व स्विकारून भारत देशाला जागतिक पातळीवर सर्वोच्च सन्मान मिळवून दिला त्यामागे मातोश्री हिराबेन यांचा समर्थ आर्शिवाद होता. आईचे स्थान प्रत्येकासाठी अलौकीक असून मातोश्री हिराबेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेली शिकवण गौरवपुर्ण आहे. त्यांच्या निधनाने आपण सुसंस्कारीत मातृत्वाच्या नेतृत्वाला हरपलो आहोत असे त्या म्हणाल्या. 

           याप्रसंगी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्ता काले, संजीवनी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदीप नवले, उपाध्यक्ष राजेंद्र परजने, विजय आढाव, विनोद राक्षे, हरीभाऊ लोहकणे, दिपक चौधरी, प्रमोद नरोडे, अविनाश पाठक, नारायण शेठ अग्रवाल, बबलु वाणी, विनोद चोपडा, जनार्दन कदम, दादाभाउ नाईकवाडे, राजेंद्र बागुल, गणेश राऊत, संदिप गुरळे, किरण सुपेकर, संजय खरोटे, गोरख देवडे, वैभव आढाव, महेश खडामकर, दिलीप शुक्ला, दिपक राऊत,जगदीश मोरे, स्वप्निल निखाडे, मुक्तार पठाण,

राजकुमार दवंगे, सलीम पठाण, खालीकभाई कुरेशी, मनोज इंगळे, मंगेश गायकवाड, दिपक जपे, संतोष नेरे, विजय गायकवाड, प्रभाकर शिंदे, संजय होले, दादासाहेब मोरे, गणेश थोरात, प्रमोद चौधरी, उल्हास पवार, मुकुंद काळे, शामराव आहेर, सचिन सावंत, वासुदेव शिंदे,राजेंद्र पाटणकर, विष्णूपंत गायकवाड, चंद्रकांत वाघमारे, योगेश बागुल, अतुल काले, पप्पु पडीयार, प्रकाश दवंगे, यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.