कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाचा विद्यार्थी विवेक निरंकार निकम हा देशात द्वितीय क्रमांक पटकावून रौप्यपदकाचा मानकरी ठरला आहे.
शैक्षणिक वर्षे सन २०२२-२३ या वर्षात करीता डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेचे चे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी देनभरातून तब्बल ९५ हजार मुलांनी सहभाग घेतला होता. ९५ हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ २०८ मुलांची निवड झाली त्यात आत्मा मालिक शैक्षणिक संकुलातील आत्मा मालिक सुपर फौंडेशनमधून इयत्ता ९ वीत शिक्षण घेणारा विवेक निरंकार निकम हा या स्पर्धेत रौप्यपदकाचा मानकरी ठरला आहे.
विवेक निकम याला आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाचे प्रमुख व आत्मा मालिक ध्यानपिठ तथा विश्वात्मक जिंकली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, प्राचार्य निरंजन डांगे, अथर्व फौंडेशन अकॅडमीचे शिवम तिवारी तसेच सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
विवेक निकम यांच्या यशाबद्दल सद्गुरू ओमगुरुदेव माऊलींच्या आशीर्वादासह संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, सरचिटणीस हनुमंत भोंगळे, सर्व विश्वस्त, शैक्षणिक संकुलाचे प्रमुख सुधाकर मलीक, प्राचार्य निरंजन डांगे यांच्यासह शिक्षक, पालकांनी अभिनंदन केले आहे.
दरम्यान आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत विविध शालांत परीक्षेत तसेच विविध शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये यशाचा विक्रमी आलेख उंचावत असल्याने येथे शिक्षण घेण्यासाठी राज्यासह देशभरात विद्यार्थी येत आहेत. अध्यात्मिक वातावरणात परिपुर्ण शिक्षण देणारी ही शिक्षण संस्था पालकांच्या पसंतीची संस्था झाली आहे.