ठोळे उद्योग समुहाचे वतीने कोनपा शाळेला एलसीडी भेट

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : आजकाल कौटुंबिक आर्थिक समस्या वाढल्याने शालाबाह्य मुलांची समस्या निर्माण झाली आहे. शालेय शिक्षण घेणारी अनेक विद्यार्थी शाळा सोडून आर्थिक उत्पन्नासाठी रोजगार करताना वा ईतर मार्गाने कुटुंबास आर्थिक मदत करताना दिसतात. शालाबाह्य मुलांची गळती रोखण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत असे विचार कैलास ठोळे यांनी व्यक्त केले.

     ठोळे उद्योग समुहाचे वतीने कोपरगाव नगरपालिका शाळा नंबर एक साठी एल सी डी प्रदान समारंभ आयोजित केला होता. स्वागत ऊपशिक्षीका भालेराव यांनी केले. प्रास्ताविक विजय बंब यांनी केले. शाळेच्या वतीने जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या अध्यक्षा सौ सुधा भाभी ठोळे यांचा, कैलास ठोळे यांचा, जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या सभासदांचा सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापिका सौ तरवडे ( बिबवे ) यांनी शाळेच्या ऊपक्रमाची माहिती दिली.

समारंभासाठी लायनेस क्लबच्या माजी अध्यक्षा शोभना ठोळे, दिपा ठोळे, जेष्ठ नागरिक सेवा मंचचे उपाध्यक्ष दत्तोपंत कंगले, वसंत तात्या आव्हाड, उत्तम भाई शहा, सुवालाल भंडारी, हभप जगन्नाथ महाराज थोरे, पेंटर दारुवाला, संजय को-हाळकर, सुभाष जोशी, माजी उपनगराध्यक्षा मिनल खांबेकर डॉ. विलास आचारी, हेमचंद्र भवर आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी शाळेच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. सोमासे ताईंनी आभार मानले.