शेवगाव बाजार समिती निवडणुकीत ३८ उमेदवार रिंगणात

शेवगाव प्रतिनिधी, दि . २० : शेवगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ३० एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या एकूण २५० पात्र उमेदवारी अर्जापैकी  गुरुवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी  २१२ उमेदवारानी आपले अर्ज मागे घेतल्याने १८ जागांसाठी एकूण ३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब अजमावत असून  माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी प्रणीत ज्ञानेश्वर  शेतकरी विकास मंडळ व आमदार मोनिकाताई  राजळे यांच्या नेतृत्वाखालील  भाजप प्रणीत आदिनाथ शेतकरी मंडळात  होणाऱ्या दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. तर ग्रामपंचायत सर्व साधारण मतदार संघ व भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघात एकेक असे दोघे अपक्षही उभे आहेत.  

       यावेळी सहायक निबंधक कार्यालयास यात्रेचे स्वरूप आले होते. सकाळ पासूनच येथे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मोठी गर्दी उसळली. येथील मारुतराव घुले पाटील जिनिग प्रेसिंग मध्ये थांबून माजी आमदार चंद्र शेखर घुले, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी इछुकांशी चर्चा करून आपल्या मंडळाच्या उमेदवाराची अंतिम यादी जाहीर केली. तर आमदार राजळे यांच्या येथील संपर्क कार्यालयात भाजप प्रणीत आदिनाथ शेतकरी मंडळाच्या उमेदवारांची अंतिम यादी बापूसाहेब पाटेकर, कचरू चोथे, महेश फलके आदींच्या  प्रमुख उपस्थिती होती.

  आदिनाथ शेतकरी मंडळाकडू  कॉग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते , माजी तालुका प्रमुख  डॉ.अमोल फडके यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर बाजार समितीच्या मावळत्या संचालक मंडळातील राषट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे व बाजार समितीचे माजी सभापती विदिज्ञ अनिल मडके अशा दोघाना ज्ञानेश्वर शेतकरी विकास मंडळाकडून पुन्हा संधी देण्यात आली असून इतर सर्व उमेदवार नवीन आहेत.

     मतदार संघ निहाय उमेदवार पुढील प्रमाणे – सोसायटी मतदार संघ -सर्व साधारण –
राहुल शंकराव बेडके, अशोकराव अण्णासाहेब धस , गणेश बाबासाहेब खंबरे, अनिल बबनराव मडके , नानासाहेब बबन मडके , एकनाथ दिनकर कसाळ , जमीर अब्बासमिया पटेल (ज्ञानेश्वर शेतकरी विकास मंडळ) तर  भगवान एकनाथ तेलोरे , जगन्नाथ नामदेव भागवत , हरिभाऊ भानूदास झुंबड , मुसाभाई  दगडूभाई शैख , सचिन पांडुरंग वाघ , ज्ञानेश्वर दत्तात्रय कुलट , सोमनाथ मारूती  आधाट , (आदिनाथ शेतकरी मंडळ )   महिला राखीव – चंद्रकला श्रीकिसन कातकडे, रागिनी सुधाकर लांडे , (ज्ञानेश्वर शेतकरी विकास मंडळ)  सुनन्दा रामदास दिवटे ,रुखमिनी विठ्ठल  सुखासे ,(आदिनाथ शेतकरी मंडळ )   इतर मागासवर्ग – हनुमान बापूराव पातकळ (ज्ञानेश्वर शेतकरी विकास मंडळ) सोपान जगन्नाथ जमधडे,   (आदिनाथ शेतकरी मंडळ ) विमुक्तजाती भटक्या जमाती – राजेंद्र शिवनाथ दौंड ,

(ज्ञानेश्वर शेतकरी विकास मंडळ) हनुमान भगवान बेळगे (आदिनाथ शेतकरी मंडळ ) वसंत दशरथ गव्हाणे(अपक्ष ) ग्रामपंचायत सर्व साधारण – संजय मोहनराव  कोळगे , अशोक रामभाऊ मेरड (ज्ञानेश्वर शेतकरी विकास मंडळ) दिलीप हरिभाऊ विखे, संभाजी दशरथ कातकडे  (आदिनाथ शेतकरी मंडळ )  शिवाजी रामा भुसारी(अपक्ष ) अनुसूचीत जाती जमाती – अरुण भास्कर घाडगे  (ज्ञानेश्वर शेतकरी विकास मंडळ) सुखदेव माधव खंडागळे (आदिनाथ शेतकरी मंडळ ). आर्थिक दुर्बल घटक – प्रीती राम अंधारे (ज्ञानेश्वर शेतकरी विकास मंडळ) वर्षा महादेव पवार(आदिनाथ शेतकरी मंडळ ) व्यापारी आडते  – जाकीर शफी कुरेशी , मनोज काशीनाथ तिवारी (ज्ञानेश्वर शेतकरी विकास मंडळ) खंडू मोहन घनवट, अमोल एकनाथ फडके , (आदिनाथ शेतकरी मंडळ ) हमाल मापाडी – प्रदीप नानासाहेब काळे