संजीवनीच्या  १३ अभियंत्यांना कोलगेट पालमोलिव्हमध्ये ८ लाखांचे पॅकेज – अमित कोल्हे

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २० : संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने कोलगेट पालमोलिव्ह इंडिया प्रा. लि., मुंबई या विविध जीवनावश्यक वस्तु बनविणाऱ्या कंपनीने संजीवनीमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत तेरा विध्यार्थ्यांना वार्षिक पॅकेज रूपये ८.२ लाख देवु करून नोकरीसाठी निवड केली आहे. त्यांच्या अंतिम निकालाच्या अगोदरच निवड झालेले विध्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असुन सर्वच विध्यार्थी व पालक आनदोत्सव साजरा करीत आहे, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंट विविध नामांकित कंपन्यांशी संपर्क साधुन त्या कंपन्यांना कोणते ज्ञान असलेले अभियंते पाहीजे याचा अभ्यास करते. तसा अभ्यासक्रम विविध भियांत्रिकीच्या विभागांना कळविला जातो. प्रत्येक विभागामार्फत तशी तयारी करून घेतल्या जाते. तसेच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग मुलाखतीचे तंत्र, भाषा  प्रभुत्व, देहबोली, हजरजबाबीपणा, आदरयुक्त संभाषण, अशा अनेक बाबींचे रूजवण विध्यार्थ्यांमध्ये करते.

या सर्व बाबींमुळे संजीवनीचे विध्यार्थी जॉब रेडी असतात आणि कंपन्यांनाही संजीवनीच्या विध्यार्थ्यांना फारसे प्रशिक्षण देण्याची गरज पडत नाही, अशा अनेक कंपन्यानी प्रतिक्रिया दिली आहे. यामुळेच संजीवनीच्या सर्व व्यावसायिक संस्था आपल्या विध्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या पॅकेजच्या नोकऱ्या  देण्यासाठी आघाडीवर आहे.

अलिकडेच कोलगेट पालमोलिव्ह या कंपनीने निशा अर्जुन सानप, लतिकाबेन चंद्रकांत नागपुरे, साक्षी सुनिल कथले, शुभांगी संजय लुनगडे, ऋतुजा रावसाहेब मोरे, संस्कृती ज्ञानेश्वर  सोनार, आकाश  प्रकाश  कर्पे, चेतन ओमप्रकाश  खंडेलवाल, अर्पिता बाळासाहेब गमे, नंदिनी कुमार गुजराथी, शीतल  कैलास काळे, सय्यम अनिल गंगवाल व प्रज्वल अभय देशपांडे यांची निवड केली आहे.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेले गुणवंत नवोदित अभियंते व त्यांच्या भाग्यवान पालकांचे अभिनंदन केले आहे. तसेच अमित कोल्हे यांनी सर्व विध्यार्थ्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाचे डीन डॉ. व्ही. एम. तिडके, विभाग प्रमुख डॉ. डी. बी. क्षिरसागर, डॉ. एम. ए. जावळे व डॉ. डी. बी. परदेशी  उपस्थित होते.

   मला कॉलेजमध्ये पायथन प्रोग्रामिंग व एसक्युएल डेटाबेस या संगणकिय भाषांचा  सखोल अभ्यास शिकविण्यात आला. तसेच मला सुचविण्यात आलेल्या इंटर्नशिपचाही खुप फायदा झाला. ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाने आमच्याकडून खुप तयारी करून घेतली होती. त्यामुळे कंपनीच्या प्रतिनिधिंनी विचारलेल्या प्रश्नांची  सहज उत्तरे देवुन माझी नोकरीसाठी निवड झाली, संजीवनीमुळे माझे व माझ्या पालकांचे स्वप्न पुर्ण झाले. -निशा  सानप

आमच्या कॉलेजने एसएपी या प्रशिक्षण देणाऱ्या  जागतिक पातळीवरील कंपनीशी  सामंजस्य करार केला केला आहे. या कंपनीचे एक केंद्र संजीवनी मध्ये असुन या केंद्राद्वारे आम्हाला प्रशिक्षण  देवुन सक्षम केल्या जाते. मी सुध्दा एसएपीचा कोर्स केला होता. तसेच कॉलेजच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाचा ‘कॅम्पस क्रेडींशियल्स’ हा कोर्सही केला होता. या सर्व बाबींचा उपयोग मला कोलगेट पालमोलिव्हच्या मुलाखतींमध्ये झाला. आणि माझाी नोकरीसाठी निवड झाली. संजीवनमुळेच माझी चांगल्या पॅकेजवर नोकरदार होण्याचे स्वप्न पुर्ण झाले. – यश  गुंजाळ