कोपरगाव प्रतिनिधी, दि. १९ : माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या स्मरणार्थ संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने युवा नेते विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून ‘मोफत फिरता दवाखाना’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना शहरात महागड्या रुग्णालयात जाऊन औषधोपचार घेणे परवडत नसल्याने हा ‘मोफत फिरता दवाखाना’ त्यांच्यासाठी वरदान ठरला आहे.
या स्तुत्य व कौतुकास्पद उपक्रमाचे ठिकठिकाणी नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत होत असून, या उपक्रमाच्या माध्यमातून मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी युवा नेते विवेक कोल्हे व कोल्हे कुटुंबीयांचे आभार मानले आहेत.
संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने ‘स्व. शंकरराव कोल्हेसाहेब मोफत फिरता दवाखाना’ या उपक्रमांतर्गत अत्याधुनिक फिरत्या रुग्णवाहिकेद्वारे कोपरगाव विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. बुधवारी (१३ सप्टेंबर) कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे दाखल झालेल्या ‘मोफत फिरता दवाखाना’ चे ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. या मोफत फिरत्या दवाखान्यास नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानदेव पाराजी औताडे व संजय रामराव औताडे, अप्पासाहेब रंभाजी औताडे, अशोक जगन्नाथ औताडे, शंकरराव लक्ष्मण औताडे, रमेश मुरलीधर औताडे, चंद्रकांत काशिनाथ औताडे, रमेश विष्णू रोहमारे, चंद्रभान अमृता रोहमारे, जगन्नाथ जयाजी औताडे, विलास सुखदेव रोहमारे, निखिल रावसाहेब औताडे, राजेंद्र जगन्नाथ औताडे, विठ्ठल ज्ञानदेव औताडे, नवनाथ लोखंडे, सुरेश शिंदे, सुरेश रहाणे, रामनाथ भालेराव, जयवंत भालेराव, इंद्रभान छबु खुरसणे, सचिन अशोक औताडे, तुषार अशोक रोहमारे, अमित आबासाहेब रोहमारे, पोहेगाव येथील डॉ. एस. के. मेहत्रे, डॉ. गवळी आदींसह पोहेगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. सुजित सोनवणे यांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधांचे वितरण केले.
माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांनी सामाजिक, राजकीय, कृषी, सहकार, सिंचन, साखर कारखानदारी, शैक्षणिक आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावून कोपरगाव तालुक्याचे नाव राज्य व देश पातळीवर उंचावले आहे. त्यांनी आपले संपूर्ण जीवन कष्टकरी शेतकरी, वंचित, शोषित व तळागाळातील लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी खर्ची घातले. संजीवनी सहकारी साखर कारखान्यासह अनेक सहकारी संस्था स्थापन करून शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध केले. ते खऱ्या अर्थाने कोपरगाव तालुक्याचे भाग्यविधाते आहेत.
संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे व संपूर्ण कोल्हे कुटुंबीय स्व. कोल्हेसाहेबांचा समाजकार्याचा वारसा नेटाने पुढे चालवत आहेत. स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांच्या स्मृती जपण्यासाठी विवेक कोल्हे यांनी ‘मोफत फिरता दवाखाना’ सुरू करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा आधार दिला आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून फिरत्या रुग्णवाहिकेद्वारे गावोगावी जाऊन तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी व वैद्यकीय उपचार सुविधा दिली जात आहे. युवा नेते विवेक कोल्हे यांनी गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हा ‘मोफत फिरता दवाखाना’ सुरू केल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही मोफत आरोग्य सेवा यापुढील काळातही अखंड सुरू ठेवावी, अशी अपेक्षा नागरिकांनी यावेळी व्यक्त केली.