कोपरगाव शहरात सुसज्ज असे रुग्णालय उभे राहणार – आमदार काळे

Mypage

कोपारगाव प्रतिनिधी, दि.०२ :- कोपरगाव शहरात होणारे उपजिल्हा रुग्णालय व कोपरगाव बस आगारात होणाऱ्या व्यापारी संकुलाच्या भूमी पूजनाची तयारी सुरु असून त्याबाबत आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच कार्यकर्ते शासकीय अधिकारी व सबंधित कॉन्ट्रॅक्टर यांच्या समवेत पाहणी करून अडचणी जाणून घेत अधिकारी व कॉन्ट्रॅक्टरला सूचना दिल्या.

Mypage

मतदार संघातील लोकसंख्येचा विचार करता रुग्णांना मिळणारी आरोग्य सुविधा लोकसंख्येच्या प्रमाणात कमी पडत होती. त्यामुळे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणी वर्धन होऊन १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी आ. आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी देवून २८.८४ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.

Mypage

लवकरच या कामाचे भूमिपूजन होवून कामास प्रारंभ होणार असून कोपरगाव शहरात सुसज्ज असे रुग्णालय उभे राहणार आहे. तसेच कोपरगावकरांना विकसित कोपरगावचे दाखविलेले स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न, शहर विकास त्याचबरोबर बस स्थानक परिसरात व्यापारी संकुल उभारले जाऊन बेरोजगार युवक व गरजू नागरिकांना व्यवसाय करण्याच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आ.आशुतोष काळे यांचा निवडून आल्यापासून पाठपुरावा सुरु होता.

Mypage

त्या पाठपुराव्यातून कोपरगाव बस स्थानकाच्या लगत व्यापारी संकुलाला मंजुरी देण्यात आली आहे. या व्यापारी संकुलाच्या १४ कोटीच्या कामाची निविदा प्रसिद्ध होवून या कामास देखील लवकरच प्रारंभ होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव बस आगारात होणाऱ्या व्यापारी संकुलाच्या व १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालयाच्या या दोन्ही कामांच्या भूमिपूजन तयारीचा आ. आशुतोष काळे यांनी संयुक्तिक आढावा घेतला.

Mypage

यावेळी बसस्थानक व्यापारी संकुलाच्या पाहणी प्रसंगी आगार व्यवस्थापक अमोल बनकर, सहाय्यक वाहतूक अधीक्षक योगेश दिघे, वाहतूक निरीक्षक गिरिष खेमनर, अविनाश गायकवाड, विभागीय अभियंता राम राशीनकर, कनिष्ठ अभियंता संजय दरेकर, उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वरजी चाकणे तसेच उपजिल्हा रुग्णालय येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप, रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, डॉ.अमित नाईकवाडे, सचिन जोशी आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

Mypage