मराठा समाजच्या आमरण उपोषणाला कोपरगाव राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठिंबा

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू असून या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी अनेक ठिकाणी मराठा समाज आमरण उपोषण व आंदोलने करीत आहे.

त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी ॲड. योगेश खालकर, अनिल गायकवाड व विनय भगत हे मराठा बांधव सोमवार (दि.११) पासून आमरण उपोषणास बसले आहेत. कोपरगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या या आमरण उपोषणाला माजी आमदार अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिकृत पत्र देवून जाहीर पाठींबा देण्यात आला आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे, संचालक राजेंद्र निकोले, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, रमेश गवळी, कृष्णा आढाव, फकीर कुरेशी, दिनकर खरे, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, विद्यार्थी शहराध्यक्ष निखील डांगे, 

गौतम बँकेचे माजी संचालक सुनील शिलेदार, चंद्रशेखर म्हस्के, बाळासाहेब रुईकर, अशोक आव्हाटे, राजेंद्र खैरनार, शशिकांत देवकर, मनोज नरोडे, अक्षय आंग्रे, आप्पा आढाव, समीर वर्पे, योगेश डोखे, अमोल आढाव, बाळासाहेब शिंदे, गणेश जाधव, सोमेश नरोडे, नीरज घंगारे, विजय शिंदे, बाळासाहेब दहे, अनिरुद्ध काळे आदी उपस्थित होते.