कर्मवीर काळे कारखान्याचे मयत कामगाराच्या वारसास धनादेश सुपूर्त

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी यशवंत बापु हाळनोर यांचे अपघाती निधन झाल्यामुळे त्यांच्या वारस पत्नी श्रीमती अलका यशवंत हाळनोर यांना कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते ३ लाख २० हजार रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला. 

Mypage

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे ऊस विभागाचे हंगामी कायम कर्मचारी यशवंत बापु हाळनोर यांचा १३ एप्रिल २०२३ रोजी अहमदनगर येथे जात असतांना निंबळक बायपास अहमदनगर येथे अपघात होवून त्यांच्यावर साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शिर्डी येथे उपचार सुरु असतांनाच त्यांचे निधन झाले होते.

Mypage

कारखान्याचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रशासनाने कारखान्यातील सर्व कायम, हंगामी (कायम), हंगामी (टेंपररी) व दैनिक वेतनावरील हजेरी पत्रकावरील सर्व कामगारांचा दि ओरिएंटल इंशुरन्स कंपनी लि. शाखा कोपरगाव यांचेकडे अपघाती विमा घेतलेला आहे. जेणेकरून दुर्दैवाने कर्मचाऱ्याचे अपघाती निधन झाल्यास मयत कामगारांच्या वारसांना आर्थिक अडचण जाणवू नये या उद्देशातून अपघाती विमा घेतलेला आहे. 

Mypage

जनता सामुहीक विमा पॉलिसीच्या माध्यमातून अपघातग्रस्त कर्मचाऱ्यांना रु.८०,०००/- दवाखाना खर्चासाठी दिले जातात व कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यु झाल्यास रु.३,२०,०००/- नुकसान भरपाई दिली जाते. मयत कर्मचारी यशवंत बापु हाळनोर यांचे अपघाती निधन झाल्यानंतर त्याबाबत कारखाना प्रशासनाने दि ओरिएंटल इंशुरन्स कंपनीकडे विमा पॉलिसीची भरपाई मिळावी यासाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली होती.

Mypage

ओरीएंटल इंशुरन्स कंपनीने सादर करण्यात आलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करून मयत कर्मचारी यशवंत बापु हाळनोर यांच्या वारसांना विमा पॉलिसिपोटी ३ लाख २० हजार रुपयांची नुकसान भरपाई विमा रक्कम मंजूर केली होती. सदरच्या ३ लाख २० हजार रक्कमेचा धनादेश नुकताच मयत कर्मचारी यशवंत बापु हाळनोर यांच्या वारस पत्नी श्रीम. अलका यशवंत हाळनोर यांना कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, सेक्रेटरी बाबासाहेब सय्यद, असि. सेक्रेटरी संतोष शिरसाठ, लेबर ऑफिसर सुरेश शिंदे आदी उपस्थित होते. 

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *