न्यू आर्ट्समध्ये राष्ट्रीय युवा दिन साजरा

शेवगाव प्रतिनिधी, दि. १३ : येथील न्यू आर्टस् महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व रेड रिबन क्लबच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता जिजाऊ आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंती, राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने ‘स्वामी विवेकानंद यांचा वैचारिक दृष्टीकोन’ या विषयावर दादा पाटील राजळे महाविद्यालयातील प्रा. अमोल आगासे यांच्या विशेष मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

      प्रा. आगासे यांनी,स्वामी विवेकानंद हे चिकित्सक वृत्तीचे, तत्वज्ञानी, आकर्षक व्यक्तिमत्वाचे प्रकांड पंडित होते. त्यांच्या  तत्वज्ञानाची पताका सर्व देशभर दिसून येते. त्यांनी भारतभर परिक्रमा केली.  मानवता हा एकच धर्म आहे हाच संदेश विवेकानंदांनी दिला. असे सांगून आत्मबल आणि धैर्य जोपासून संकटांना धैर्याने सामोरे गेले पाहिजे असे आवाहन केले.

प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम  कुंदे अध्यक्षस्थानी होते. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विजयकुमार बाणदार, रेड रिबन क्लबच्या श्रीमती दहिफळे, प्रा. मिनाक्षी चक्रे, महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. डॉ अनिता आढाव यांनी प्रास्ताविक तर प्रा. मफिज इनामदार यांनी सुत्रसंचलन केले. डॉ. उषा शेरखाने यांनी आभार मानले.