जीवनात डोळ्यांना अनमोल महत्व – डॉ.सुधा कांकरीया

शेवगाव प्रतिनिधी, दि. १३ : मनुष्याच्या शरीराची खिडकी म्हणून डोळ्यांची ओळख असल्याने जीवनात डोळ्यांना अनमोल महत्व आहे. आपल्या इतरांच्या प्रती असलेल्या भावना डोळ्यातून प्रगट होतात. त्यामुळे प्रत्येकाचे डोळे निरोगी असावेत. प्रत्येकाने आपल्या डोळ्यातून भव्य दिव्य स्वप्ने पहिली पाहिजेत व ती स्वप्ने प्रत्यक्षात उतरण्यासाठी धडपड करणे देखील आवश्यक असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या, प्रसिध्द नेत्र तज्ञ,  डॉ.सुधा कांकरीया यांनी केले.

     शेवगाव रोटरी प्रतिष्टान संचालित रोटरी आय केअर व क्लिनिकल लॅबोरेटरी या उपक्रमाचा शुभारंभ नेत्र तज्ञ  डॉ. कांकरीया यांच्या हस्ते, डॉ.प्रकाश कांकरीया, रोटरीचे डीस्ट्रीक्ट गव्हर्नर रुकमेश जाखोटिया, संगमनेर रोटरीचे दिलीप मालपाणी, ऋषिकेश मुंढे, उद्धव शिरसाठ, ज्येष्ठ अर्थतज्ञ श्री रेणुकामाता मल्टीस्टेटचे प्रवर्तक डॉ.प्रशांत भालेराव आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.   

         यावेळी डॉ.कांकरीया बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या , जीवनात दृष्टीला मोठे महत्व आहे. दृष्टी नसेल तर सृष्टी दिसणार नाही. जीवन अंधकारमय होईल . शेवगाव शहर व तालुक्यातील नेत्र रुग्णांना सेवा देण्यासाठी उभारलेल्या या आरोग्य मंदिरातून गरजू व गरिबांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा निश्चित मिळतील असा विश्वास  व्यक्त केला . नेत्रदानाचे महत्व सांगून नेत्रदान करण्याचे आवाहन केले. सामाजिक कार्यकर्ते द्वारकानाथ लाहोटी व सौ.सुरेखा लाहोटी यांचा या उपक्रमास  सहकार्य केल्या बद्दल सन्मान करण्यात आला.

      यावेळी सामाजिक कार्यकर्त्या स्नेहलता लबडे, रोटरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष किसनराव माने, आण्णासाहेब दिघे, प्रवीण लाहोटी, डॉ.गणेश चेके, भागनाथ काटे, बाळासाहेब चौधरी, डॉ.पुरुषोत्तम बिहाणी, प्रा .काकासाहेब लांडे,  डॉ.मनीषा लड्डा, वल्लभ लोहिया, डॉ.हरीश्चंद्र गवळी, युसुफ पठाण, डॉ.अरविंद पोटफोडे, सुधाकर जावळे, श्रीमंत घुले, खंडू बुलबुले, वसुधा सावरकर , सुनिल रासने आदीं मान्यवरांची उपस्थिती होती.

रोटरी प्रतिष्ठानचे सेक्रेटरी डॉ.संजय लड्डा यांनी पाहुण्यांचा परिचय करून स्वागत केले .रोटरीचे अध्यक्ष डॉ.आशिष लाहोटी यांनी प्रास्ताविक तर प्रा. दिलीप फलके यांनी सूत्रसंचालन केले. आय.केअर मोहिमेचे प्रोजेक्ट चेअरमन डॉ.मयूर लांडे, यांनी आभार मानले.