आमदार काळेंच्या शिष्टाईने मुस्लीम समाजाचे उपोषण मागे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२३ : कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथे पवित्र कुराणची विटंबना करणाऱ्या दोषींना लवकरात लवकर अटक करावी यासाठी मुस्लिम बांधवांच्या वतीने करण्यात आलेले उपोषण आ. आशुतोष काळे यांच्या मध्यस्तीने मागे घेण्यात आले आहे.

कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथे अज्ञात व्यक्तीकडून पवित्र कुराणची विटंबना करण्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. परंतु अद्यापपर्यंत पोलीस आरोपीला पकडू शकले नाहीत. त्यामुळे संबंधित आरोपीला तातडीने अटक करावी. यासाठी मुस्लिम समाजाने कोपरगाव तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते.

या घटनेतील आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना अटक करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना निवेदन देखील देण्यात आले होते व मुस्लिम बांधवांच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या आमरण उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पाठींबा देखील देण्यात आला होता.

याबाबत आ. आशुतोष काळे यांनी स्वत: उपोषण करणाऱ्या मुस्लीम बांधवांची भेट घेवून त्यांच्या मागण्या जाणून घेत पोलीस प्रशासनाकडून तपासाची माहिती जाणून घेतली. यावेळी उपोषणकर्ते व पोलीस प्रशासन यांच्यामध्ये यशस्वी शिष्टाई करून सदर घटनेचा संपूर्ण निःपक्षपातीपणे तपास केला जाईल व दोषींना लवकरात लवकर अटक केली जाईल असे आश्वासन पोलीस प्रशासनाच्या वतीने आ. आशुतोष काळे यांनी उपोषणकर्त्यांना दिले. त्यावेळी उपोषणकर्त्यांनी आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते लिंबू पाणी घेवून आपले उपोषण मागे घेतले.

यावेळी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, कमिटी सदस्य माजी नगरसेवक फकीर कुरेशी, हाजीमेहमूद सय्यद, सलीमपठाण, रियाज सर, अस्लमशेख, मुक्तार मन्सूरी, मौलाना मुक्तारभाई, मौलाना निसारभाई, जावेद शेख, अल्ताफ शेख, अल्ताफ कुरेशी, हारुण शेख, सद्दाम सय्यद, मुन्ना शेख, शादाब शेख, उपोषणकर्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी, माजी नगरसेवक अजीज शेख, जावेद शेख, फिरोज पठाण, इरफान शेख, अन्सार शेख, अन्वर शेख, तौसिफ मणियार, फिरोज मणियार, जुनेद खाटीक, अकबर शेख, 

अयाज कुरेशी, इरफान कुरेशी, इम्रान शेख, अमजद शेख, नदीमशेख, नदीम अत्तार, हाजी जावेद शेख, आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, रमेश गवळी, दिनकर खरे, राजेंद्र वाकचौरे, सुनील शिलेदार, चंद्रशेखर म्हस्के, प्रकाश दुशिंग, बाळासाहेब रुईकर, वाल्मिक लहिरे, धनंजय कहार, इम्तियाज अत्तार, रहेमान कुरेशी, आकाश डागा, अक्षय आंग्रे, मनोज कडू, शैलेश साबळे, मनोज नरोडे, राजेंद्र आभाळे, मुकुंद इंगळे, फिरोज पठाण, विकी जोशी, विजय नागरे, सागर लकारे, हारुण शेख, शकील शेख, शफीक शेख, रिंकेश खडांगळे, प्रदीप कुऱ्हाडे आदी उपस्थित होते.