उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे डॉक्टरेट बहुमानाबद्दल कोल्हेनी केले अभिनंदन

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजवरच्या सामाजिक राजकीय कारकिर्दीचा सन्मान जपानच्या कोयासन विद्यापीठाने केला असुन त्यांच्या सर्वोत्कृष्ट प्रशासकीय कारकिर्दीबददल अध्यक्ष रे. सोईडा र्युषों व अधिष्ठाता सोएदा सॅन यांनी मानद डॉक्टरेट उपाधी देण्याची घोषणा केली त्याबद्दल राज्य सहकारी साखर संघाचे संचालक विवेक कोल्हे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. 

विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेल्या नामदार देवेंद्र फडणवीस यांनी वयाच्या २२ व्या वर्षी नागपुर महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून आपल्या सामाजिक, राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली. त्यांनी ४४ व्या वर्षी महाराष्ट्र राज्याचे सर्वात कमी वयाचे दुसरे मुख्यमंत्री होण्याचा बहुमान मिळविला.

स्वतः कायद्याबरोबरच बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेवुन अर्थसंकल्प सोप्या भाषेत, आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर महाराष्ट्रासह चार पुस्तकांचे लेखन करत अमेरिका, वॉशिंग्टन, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड, नैरोबी, चीन, डेन्मार्क, कोपेनहेगन, मलेशिया, युरोप, रशिया, मॉस्को, स्वित्झर्लंड, होनोलुलु आदि विकसीत व विकसनशील देशातील विविध आंतरराष्ट्रीय परिषदामधुन सहभाग नोंदवत त्याच्या शिकवणुकीतुन महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा तसेच औद्योगिक विकासाला चालना देवुन या राज्याच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले असुन, त्यांच्या या कार्याची जपानच्या कोयासन विद्यापीठाने दखल घेतली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या दुरदर्शी नेतृत्व विचार शैलीच्या निर्णय प्रक्रियेमुळेच गतीमान महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्य युवापिढीसाठी मोठी प्रेरणा आहे, त्यांच्या कारकिर्दीचा आलेख असाच उंचावत राहो असेही ते शेवटी म्हणाले.