कांदा निर्यात शुल्काचा फेरविचार होणे गरजेचे – आमदार काळे      

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२३ : शेतकरी अडचणीत आहेत. पावसाळा सुरु होवून येत्या काही दिवसात तीन महिने पूर्ण होतील. परंतु अद्यापही कोपरगाव मतदार संघात समाधानकारक पर्जन्यमान झालेले नसल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आहे. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे. अशा शेतकऱ्यांना कांदा विक्रीतून काहीसा दिलासा मिळाला असता. परंतु केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार होणे गरजेचे असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

Mypage

प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व श्री संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने माजी आमदार अशोकराव काळे व आ. आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘मोफत सर्व रोग निदान शिबिराचे’ उदघाटन प्रसंगी आ. आशुतोष काळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा मा. पुष्पाताई काळे होत्या.

Mypage

यावर्षी अवकाळी पावसामुळे कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे कांदा काढल्यानंतर तो टिकणार नसल्यामुळे त्यावेळी शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात कांदा विकावा लागला. यातून चांगल्या प्रतीचा जो काही कांदा शेतकऱ्यांकडे शिल्लक राहिला त्यातीलही बराच कांदा खराब झाल्यामुळे कांद्याची टंचाई निर्माण होण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कांदा खाणाऱ्यांचा विचार करून ४० टक्के निर्यात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. परंतु केंद्र सरकारने कांदा खाणाऱ्यांबरोबर कांदा पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचा देखील विचार करणे गरजेचे असून शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या आणि हिताच्या दृष्टीने सरकारने कांदा निर्यातीवर लावलेल्या ४० टक्के शुल्क निर्णयाचा फेरविचार करावा. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही आणि कांदा खाणाऱ्यांच्याही डोळ्यात पाणी येणार नाही. यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु असुन त्याबाबत केंद्र सरकार निश्चित फेरविचार करेल– आमदार काळे.

आमदार आशुतोष काळे पुढे म्हणाले की, वाढदिवसाच्या निमित्ताने समाजोपयोगी उपक्रम राबविल्यास वाढदिवसाचे खरे खुरे समाधान मिळते. अशा मोफत सर्व रोग निदान शिबिराच्या माध्यमातून विविध आजारांचे वेळीच निदान होवून पुढे उद्भवणारा धोका टाळता येतो. या शिबिराच्या माध्यमातून श्री संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांकडून मेंदूचे आजार, युरो सर्जरी, हृदय विकार, जनरल सर्जरी, स्त्रियांचे आजार, हाडांचे आजार, कॅन्सर आदी आजारांची मोफत तपासणी, मार्गदर्शन व ज्या रुग्णांना पुढील उपचार व शस्त्रक्रियांची गरज भासल्यास मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. या निमित्ताने प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या माध्यमातून हॉस्पिटलच आपल्या दारी आले असून याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.

Mypage

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना पुष्पा काळे म्हणाल्या की, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत असून समाजातील गरजू महिलांची सखी म्हणून प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आपली जबाबदारी पार पाडत आहे. त्यामुळे महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करून त्यांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी गोदाकाठ महोत्सव, महिलांना छोट्या-मोठ्या उद्योगांसाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन, वित्त पुरवठा असे उपक्रम राबविले जात आहे.

Mypage

परंतु संसाराचा गाडा हाकतांना महिला आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नसल्यामुळे अनेक व्याधींचा होणारा त्रास सहन करतात. त्यामुळे अशा मोफत सर्व रोग निदान शिबिराच्या माध्यमातून महिलांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून आपली काळजी घ्यावी असा मौलिक सल्ला दिला.

Mypage

कोपरगाव मतदार संघात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीचा राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आढावा घेतला असून त्यावर योग्य त्या उपाय योजना करण्यासाठी पावले उचलली आहेत. निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पाण्याचा काटकसरीतीने वापर करावा लागणार आहे- आमदार काळे.

 यावेळी कारभारी आगवण, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे, संचालक रामदास केकाण, राजेंद्र निकोले, जिनिंग, प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, संचालक नानासाहेब निकम, संदीप शिंदे, संजय संवत्सरकर, मा. जि. प. सदस्या विमल आगवण, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक आप्पासाहेब निकम, गौतम बँकेचे माजी संचालक अनिल महाले, 

Mypage

गोधेगावचे सरपंच अशोकराव भोकरे, शिरसगावच्या सरपंच मंगल उकिरडे, तीळवणीचे सरपंच गोविंद पगारे, सांडू पठाण, माजी नगरसेविका प्रतिभा शिलेदार, मायादेवी खरे, रेखा जगताप, अशोकराव उकिरडे, कृष्णा मलिक, राहुल गायकवाड, नानासाहेब गायके, पुंडलिक चक्के, इरफान पटेल, अखिलेश भाकरे, राधु उकिरडे, प्रविण चौधरी, नितीन चौधरी, अनिल कुऱ्हे, शंकर सुंबे, पोपट भुजाडे, रामभाऊ खिलारी, अमृत शिंदे, गोपाल कुलकर्णी, सलीम पटेल, बापू भुजाडे, प्रकाश महाले, अमोल जगताप,

Mypage

 पोपटराव जगताप, महेश पाटोळे, कैलास पाटोळे, रावसाहेब चव्हाण, सुनील भोकरे, प्रकाश मलिक, संतोष शिंदे, राजेंद्र माने, सुदाम माने, मच्छिंद्र क्षीरसागर, अण्णासाहेब शिंदे, पोपटराव शिंदे, राजेंद्र गायके, भगवान बोजगे, किरण भागवत, सुलतान पटेल, दिगंबर निकम, रविंद्र निकम, हिरामण गुंजाळ, नवनाथ निकम, दिगंबर निकम, साईनाथ गव्हाळे, दिनकर भुजाडे, श्रीधर शिंदे, विनायक भोकरे, सुभाष साळवे, गणेश दाणे, अण्णासाहेब शिंदे, विजय कदम, पंढरीनाथ शिंदे, मनसुब निकम,

Mypage

 बाबुराव त्रिभुवन, रामेश्वर निकम, बाबासाहेब निकम, विशाल निकम, निलेश वाघ, भाऊसाहेब पोकळे, आप्पासाहेब चक्के, संतोष शिंदे, साईनाथ चक्के, किरण जगताप, पोपट जगताप, रविंद्र पगारे, ज्ञानेश्वर शिंदे, ज्ञानेश्वर निकम, दिनेश जमधडे, किरण नवले, किरण मलिक, बाबासाहेब मलिक, रायभान रोहोम, मच्छिंद्र निकम, सुदाम निकम, आशाबाई पोकळे,

 सुनीता शिंदे, ललिता चक्के, प्रियंका मलिक, उषा संवत्सरकर, प्रमिला चौधरी, शशिकला साळवे, भाग्यश्री बोरुडे, शितल वायखिंडे, दिक्षा उनवणे, एस.जे.एस. हॉस्पिटलच्या डॉ. सायली ठोंबरे, डॉ. स्नेहल भाकरे, डॉ. सोहेल काजी, डॉ. अनिरुद्ध उबाळे, डॉ. सिद्धेश भोईर, डॉ. महेश रक्ताटे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारभारी आगवण यांनी केले सुत्रसंचालन राहुल गायकवाड यांनी तर अप्पासाहेब निकम यांनी आभार मानले.