कोपरगाव प्रतिनिधी, दि.११ : सर्व समाजाला सम-समान न्याय देतांना तिळवण तेली समाजाचे देखील प्रश्न सोडविण्यासाठी बांधील असून समाजाचे प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी तिळवण तेली समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव शहरात नुकतीच संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी आ. आशुतोष काळे म्हणाले की, मला कोपरगाव मतदार संघाच्या जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली यामध्ये समस्त तिळवण तेली समाजाच्या नागरिकांचा देखील सहभाग आहे.
त्यामुळे कोपरगाव शहरातील इतर समाज मंदिराप्रमाणे श्री संत जगनाडे महाराजांच्या सभा मंडपासाठी देखील दहा लाखाचा निधी दिला आहे. यापुढील काळातही ज्याप्रमाणे निधी उपलब्ध होईल त्या निधीतून जास्तीत जास्त विकासाचे प्रश्न सोडवीणार असून तिळवण तेली समाजाचे उर्वरित प्रश्न यापुढील काळात मार्गी लावणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रम प्रसंगी ५ नंबर साठवण तलाव व पाणी योजना पूर्णत्वाकडे जात असल्याबद्दल तसेच पाणीपुरवठा योजनेची लोकवर्गणीची २० कोटी रुपये रक्कम राज्य शासनाकडून मिळवून देवून कोपरगावकरांचा भार कमी केल्याबद्दल समस्त कोपरगावकरांच्या वतीने तिळवण तेली समाजाच्या माता भगिनींनी आ. आशुतोष काळे यांचा सत्कार केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश गवळी, राजेंद्र वालझाडे, राजेंद्र राऊत, प्रमोद कवाडे, युवराज सोनवणे, चंदु मोरे, संकेत सोनवणे, हरिभाऊ क्षीरसागर, गणेश सोनवणे, दिलीप नेवगे, राजेंद्र सोनवणे, सुरज लोखंडे, माणिक कर्डिले, शुक्लेश्वर महापुरे, काशिनाथ चौधरी, भगवान आंबेकर, रवी राऊत, चेतन दारुणकर, चेतन सोमासे, ज्ञानेश्वर महापुरे, सूरज सोनवणे, गोरख देवडे, सुरेश सोनवणे, संतोष कवाडे, राजेंद्र लोखंडे, सुभाष
कर्पे, संतोष दारुणकर, अण्णासाहेब वालझाडे, सोपान वालझाडे, कैलास लूटे, भाऊसाहेब लूटे, अंकुश महाले, निकी सोनवणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के, शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, गौतम बँकेचे माजी संचालक सुनील शिलेदार, बाळासाहेब रुईकर, मुकुंदजी इंगळे, संदीप कपिले, शैलेश साबळे,सचिन गवारे, शुभम लकारे, सागर लकारे, रिंकेश खडांगळे आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.