के.जे. सोमैया महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा गडचिरोली राज्यस्तरीय शिबिरात सहभाग

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि.११ : कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक ईश्वर सुरेश लहिरे व अनुजा बाबासाहेब पवार यांनी गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात झालेल्या ‘राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिर आव्हान 2023’ मध्ये आपला सहभाग नोंदविला. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी दिली.

Mypage

या शिबिराबाबत अधिक माहिती देतांना महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.बी. एस.गायकवाड यांनी सांगितले की, हे शिबिर महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल आयोजित करतात. शिबिर दहा दिवसांचे असते. शिबिरामध्ये सहभागी झालेल्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यासाठी एन.डी.आर.एफ. च्या जवानांना आमंत्रित केले जाते. 25 डिसेंबर 2023 ते 3 जानेवारी 2024 या कालावधीत हे शिबिर संपन्न झाले. या शिबिरात महाराष्ट्रातून 22 विद्यापीठांचे स्वयंसेवक सहभागी झाले होते.

Mypage

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे 75 स्वयंसेवक या शिबिरात सहभागी झाले होते. त्यामध्ये महाविद्यालयाच्या ईश्वर लहिरे व अनुजा पवार यांचा समावेश होता. दोन्ही स्वयंसेवकांनी महाविद्यालयात परत आल्यानंतर तेथील अनुभव व मिळालेले ज्ञान इतर स्वयंसेवकांसमोर कथन केले. या शिबिरातील सहभागी विद्यार्थांना संस्था व महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष मा.अशोक रोहमारे, विश्वस्त मा.संदीप रोहमारे, सचिव ॲड. संजीव कुलकर्णी, प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रम अधिकारी डॉ.बी.एस. गायकवाड, प्रा.सदाशिव नागरे व डॉ.एस.बी.भिंगारदिवे हे उपस्थित होते.

Mypage