तालुक्याचे नेतेच मुख्यमंत्र्यांच्या तोडीचे आहेत – सम्राट फडणीस

कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूहाच्यात वतीने पत्रकार दिन साजरा

कोपरगाव प्रतिनिधी दि.११ : नगर जिल्ह्यातील एक-एक नेता इतका भक्कम आहे की ते मुख्यमंत्र्याच्या तोडीचे आहेत.  प्रत्येक तालुकाचा नेता हा राज्याच्या मुख्यमंञी पदाच्या दर्जाचे अर्थात मुख्यमंत्री आहेत असे मत ज्येष्ठ संपादक सम्राट फडणीस यांनी व्यक्त केले. मराठी पत्रकारितेचे जनक, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती निमित्त कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूहाच्या वतीने आयोजित पत्रकारांचा सन्मान सोहळ्याप्रसंगी सम्राट फडणीस बोलत होते.

अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोक काळे होते. यावेळी आमदार आशुतोष काळे, कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. मच्छिंद्र बर्डे, गौतम सहकारी  बॅंकेचे चेअरमन सुधाकर दंडवते, संचालक दिनार कुदळे , कारभारी आगवण, देवेन रोहमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत व प्रास्ताविक माजी संचालक कारभारी अगवान यांनी केले. यावेळी बोलताना फडणीस पुढे म्हणाले की, या जिल्ह्यातील नेत्यांचे राजकारण कसे चालते यावरून पुढच्या काळात राज्याचं राजकारण ठरते. त्यावरून राज्यातील इतर भागातील जनमत बदलते म्हणुन नगर जिल्ह्यात पञकारीता करणे खुपचं महत्वाचे समजले जाते.

सम्राट फडणीस – मनोरंजनात्मक बातमीदारी ही धोक्याची झाली आहे.  तांत्रिक बदल पञकारांनी अवगत करणे गरजेचे आहे. शंभर वर्षांपूर्वीचे बातमीदारीचे तत्व व सध्याची तांत्रिक बाबीची सांगड घालुन पञकारीता केली पाहिजे. 

पञकारीतेत मुळ उद्देश ही नकारात्मक पञकारीता आहे. सरकार, नेते व संस्थांमधील कारभाराच्या नकारात्मक बाबी समाजापुढे मांडून अंकुश ठेवण्याचे काम पञकारांचे आहे. केवळ नेतेगिरी करणे, सल्ला देणे हे पत्रकारांचे काम नाही. जी वस्तुस्थिती आहे ती समाजापुढे मांडण्याचे खरेकाम पत्रकाराचे आहे. प्रत्येक क्षेत्रातील अभ्यासासमवेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घातली तर चांगले पत्रकार घडून भविष्यातील पत्रकारितेला दिशा देता येईल. पत्रकारिता हे व्यवसायीकतेचे नाही तर सेवेचे व्रत आहे.

काळे कुटुंबियांच्या तीन पिढ्यांनी सहकार व रयत शिक्षण संस्थेसाठी मोठे योगदान दिले आहे. अश्या सन्मान सोहळ्यातून त्यांनी पत्रकारांशी ऋणानुबंधाची जपवणूक हि केली आहे. पत्रकारितेचे मूळ हे शेती व शेतकरी हे आहे. मात्र, ते सध्या कुठे तरी त्याचा विसर पडत चालला असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. मोबाईल पत्रकारिता आल्यावर पत्रकारितेच्या उद्देशाला धक्का लागला. करमणूकीवर आधारित पत्रकारितेला महत्व आले. नागरिकांना माहिती, दिशा देणे हा पत्रकारितेचा मूळ उद्देश सोडून दिल्याने पत्रकारितेचे नुकसान होण्यास सुरुवात झाल्याचे ते म्हणाले.   

यावेळी आमदार आशुतोष काळे म्हणाले की, पञकार हा समाजाचा आवाज आहे. जनमानसातील सत्य माहिती पुढे आणण्याचे काम पञकार करीत असतात त्यामुळे आमच्यासारख्यांना दिशा मिळते. स्व. खासदार शंकर काळे, माजी आमदार अशोक काळे व आत्ता माझ्यापर्यंत आमचे व पत्रकार यांचे ऋणानुबंध जुने असून तीच परंपरा यापुढे हि चालू ठेवणार आहे.

नेते व समाजाची भावना वेगळी असते त्यातील योग्य तो फरक दाखविण्याचा प्रयत्न पत्रकार करत असतात. मतदार संघातील पत्रकारांनी साथ दिल्यानेमुळेच मला मतदार संघात प्रभावीपणे काम करण्याची संधी मिळाली असे म्हणत उपस्थित पञकारांना पञकार दिनाच्या शुभेच्छा देवून त्यांचा सन्मान केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण चंद्रे यांनी तर उपस्थितांचे आभार डॉ. मच्छीन्द्र बर्डे यांनी मानले.