धर्मांतराला मदत करणारा मौलवी गजाआड 

 लव्ह जिहाद प्रकरणात चौघे ताब्यात, एक फरार 

 कोपरगाव प्रतिनिधी दि.१७ : कोपरगाव शहरातील एका हिंदू युवतीला सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढुन तिच्याशी जवळीक साधुन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करुन धर्मांतर करण्यासाठी जबरदस्ती करणारा मुख्य आरोपी सायम कुरेशी याच्यासह धर्मांतरासाठी मदत करणारा मौलवी मोहम्मद शोएब मोहम्मद साजीद वय ३१ रा. गांधीनगर, इंदौर शहर मध्यप्रदेश याला पोलिसांनी गजाआड केले असुन त्याला कोपरगाव न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. आत्तापर्यंत चार आरोपींना पोलिसांनी पकडले असुन छञपती संभाजी नगर येथील एक आरोपी अजूनही फरार आहे. 

 कोपरगावच्या लव्ह जिहाद प्रकरणाची राज्यात चर्चा जोरात सुरु असुन हिंदुत्ववादी संघटनांनी २० जुलैला मोर्चा काढणार असल्याने वातावरण सध्या तापले आहे. अशातच पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करुन कोपरगाव येथील एका युवतीवर वारंवार अत्याचार करुन धर्मांतर करण्यास मदत करणाऱ्या आरोपी पैकी एक मौलवी व इतर एक आरोपी फरार होते. माञ पोलिसांनी मोठ्या शिताफीने रविवारी दिवसभर इंदौर शहरात लपून फिरणाऱ्या मौलवीला मोठ्या शिताफीने पोलिसांनी ताब्यात घेवून कोपरगाव येथे घेवून आले.

यासाठी पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, पोलीस कर्मचारी गणेश मैड, संभाजी शिंदे, श्रीमती धराडे यांच्या पथकाने इंदौर येथील तणावाची स्थिती असतानाही मोठ्या शिताफीने मौलवी मोहम्मद शोयब मोहम्मद साजीद याला पकडून कोपरगाव न्यायालयासमोर हजर केले. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे हे करीत आहेत. 

 दरम्यान या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कोपरगाव पोलिसांनी तपासाचे चक्रे गतीम फिरवत कोपरगाव येथील आरोपींनी पिडीत हिंदू  युवतीला ज्या गाडीत घेवुन गेले होते ती इरटीका गाडी ताब्यात घेतली आहे. तसेच कोपरगाव शहराजवळील खडकी येथील मदशामध्ये युवतीवर अत्याचार झाल्याची तक्रार युवतीने केली होती त्यावर संबंधीत मदरशाचा पंचनामा करून पोलिसांना तपासाला गती देत असल्याने लवकरच लव्ह जिहाद प्रकरणाची सत्यास्थिती बाहेर येणार आहे.

 इंस्टाग्रामवर ओळख करुन कोपरगावच्या एका तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी जवळीक साधून इंदोरच्या एका मुस्लिम युवकाने जबरदस्तीने अत्याचार करुन त्या युवतीला धर्मांतर करण्यास भाग पाडले. या प्रकरणाबाबत पिढीत युवतीने तक्रार दिल्यानंतर हा लव्ह जिहाद असल्याची चर्चा सुरु झाली आणि या प्रकरणाची चर्चा राज्यात सुरु झाली. पिडीतला धर्मांतर  करुन अत्याचार करण्यास मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने मुख्य आरोपीस चौघांचा सामावेश असुन त्यात मौलवीने पिडीतेकडून कुराण पठण करीत धर्मांतर करण्यास भाग पाडल्याने या प्रकरणावर हिंदू संघटना आक्रमक झाला आहेत.

तर या प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करून यातील केवळ प्रेम प्रकरण आहे की, अन्य काही आहे. याचे सत्य बाहेर काढावे तसेच संबंधित मदशामध्ये असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे सांगत मुस्लीम संघटनेसह त्या मदरशांच्या मौलवीने पोलीसांना एक निवेदन देवु या प्रकरणाचे सत्य बाहेर काढण्याची मागणी केली आहे.