कोल्हे गटाच्या अंचलगावच्या उपसरपंचासह दोन सदस्यांचा काळे गटात प्रवेश

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : गावच्या विकासासाठी मतदारांनी निवडून दिले मात्र गावच्या विकासाचे प्रश्न सूटत नसल्यामुळे कोल्हे गटाच्या अंचलगावच्या उपसरपंचासह दोन सदस्यांनी नुकताच आ. आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत काळे गटात प्रवेश केला आहे.

    कोपरगाव तालुक्यातील अंचलगाव ग्रामपंचायतमध्ये सहा सदस्य कोल्हे गटाचे व एकच सदस्य काळे गटाचा होता. त्यामुळे साहजिकच सरपंच व उपसरपंच कोल्हे गटाचे होते. मात्र नागरिकांच्या मुलभूत विकासाचे प्रश्न सुटत नव्हते. त्याबाबत नेतृत्वाचे देखील लक्ष वेधले परंतु काहीही उपयोग होत नसल्यामुळे उपसरपंच व सदस्यांनी काळे गटात प्रवेश केला आहे.

आमदार काळे यांनी मतदार संघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने सर्वच गावांच्या रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण आदी मुलभूत प्रश्न सोडविले आहेत. त्यामुळे अंचलगावच्या विकासाचे उर्वरित प्रश्न मार्गी लावण्यासाठी काळे गटात प्रवेश केला असल्याचे अंचलगावचे कोल्हे गटाचे उपसरपंच अशोक वाघ, सदस्य सौ. संगीता शिंदे व किशोर ठोंबरे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले उपसरपंच व सदस्यांचे आ. आशुतोष काळे यांनी स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी रंगनाथ शिंदे, दिलीप शिंदे, भास्कर शिंदे, कालिदास शिंदे, कांतीलाल शिंदे, दादासाहेब जाधव, दशरथ शिंदे, रामेश्वर शिंदे, संदिप शिंदे, शरद शिंदे,  भाऊसाहेब येवले, नितीन शिंदे, अनिल शिंदे, विठ्ठल पाठक, अशोक शिंदे, सभुर शेख, गोकुळ शिंदे, दादासाहेब बनसोडे आदी उपस्थित होते.