एमआयडीसीचे श्रेय घेणाऱ्यांनी ७०० एकर जमीन उपलब्ध का करून दिली नाही? – विजय वहाडणे

 कोपरगाव प्रतिनिधी, दि.२ : कोपरगाव व राहता तालुक्यात एमआयडीसी मंजुर झाल्याचे श्रेय घेणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील नेत्यांनी जेव्हा तालुक्यात एमआयडीसीसाठी सातशे एक्कर जमीन हवी होती तेव्हा जमीन का उपलब्ध करुन दिली नाही आणि आता माझ्या व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे एमआयडीसी मंजुर झाली तर त्याचे श्रेय घेण्यासाठी तालुक्यातील नेत्यांची चढाओढ लागली असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पञकार परिषद घेवून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. 

 कोपरगाव तालुक्यासाठी नुकतीच  एमआयडीसी मंजुर झाल्याची घोषणा होताच विखे, काळे कोल्हे यांच्यात श्रेय वादाची लढाई सुरु झाली त्यात माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी ही उडी घेतल्याने एमआयडीसी आपल्यामुळे मंजुर झाली हे सांगणारे आनखी किती आहेत ते येत्या काळात समजणार आहे. झालेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी सर्वजण पुढे येत आहेत पण न झालेल्या विकास कामाचे श्रेय तितक्याच मोठ्या मनाने  कोण घेतील  का? 

माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शनिवारी त्यांच्या शहरातील निवासस्थानी पञकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांच्यासमवेत  भाजपचे उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष विनायक गायकवाड, सुभाष दवंगे, चेतन खुबानी यांची प्रमुख उपस्थिती होती.

वहाडणे पुढे म्हाणाले की, कोपरगाव तालुक्यात नवीन एमआयडीसी व्हावी यासाठी  ५ में २०१८ रोजी पासुन सलग तीन दिवस नागरीकांच्या सह्यांची मोहीम राबवली होती. तब्बल सहा हजार नागरीक व तरुणांच्या सह्या होत्या.  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळचे अध्यक्ष व तत्कालीन उद्योग मंञी सुभाष देसाई यांना हे निवेदन मी दिले होते. तेव्हा त्यांनी मला लेखी पञ दिले आहे की, आपल्या मागणी नुसार एमआयडीसीसाठी सातशे एकर जागा उपलब्ध व्हावी असे सांगितले. माञ तालुक्यातील राजकीय नेत्यांची मनस्थितीत माहीत नसल्याने ती जागा उपलब्ध करून देता आली.

 काही महीण्यापुर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते माझ्या नगराध्यक्ष कार्यकाळात केलेल्या विकास कामांची पुस्तिका प्रकाशन सोहळा  संपन्न केला होता, त्या कार्यक्रमात मी मंत्री विखे यांच्याकडे मागणी केली होती की, आम्हाला काही नको फक्त या तालुक्यातील तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी एमआयडीसी मंजूर करावी. 

 त्यावेळी मंञी विखेंनी जाहीर केले होते की, जरी जमीन नाही मिळाली तर तालुक्यातील शेतीमहामंडळाच्या जागेत एमआयडीसी मंजूर करू देतो असे सांगितले आणि अखेर विखे पाटील यांच्यामुळे तालुक्यातील चांदेकसारे येथे मंजुरी मिळाली. त्यामुळे तालुक्यातील नेत्यांनी श्रेय घेवु नये असा टोला वहाडणे यांनी अप्रत्यक्षपणे काळे व कोल्हेंना लगावला. ते पुढे म्हणाले की, एमआयडीसी आपणच मंजूर केल्याचे केवळ श्रेय घेण्यासाठी फ्लेक्स लावले, फटाके फोडून आम्हीच केले असे सांगतात.

गेली चाळीस वर्षे हेच सत्तेत असतानाही एमआयडीसी आणण्याचे का सुचले नाही. तत्कालीन उद्योग मंञ्यांना आम्ही निवेदन दिल्याचे समजताच  त्यावेळच्या तत्कालीन आमदार यांनी घाई घाईत मंञी देसाईना निवेदन देवून वहाडणेंना श्रेय जावू नये म्हणून प्रयत्न केले. जर माझ्यासारख्या सामान्य नगराध्यक्षाला जमते तर तुम्हाला चाळीस वर्ष का जमले नाही.

मंजूर झालेल्या एमआयडीसीमध्ये महसूल मंञी राधाकृष्ण विखे पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व  मुख्यमंत्री शिंदे यांचे मोठे योगदान आहे सह्या देणाऱ्या युवकांचे श्रेय आहे. श्रेय वादाच्या लढाईत मंजूर झालेल्या एमआयडीसीला आता कोणीही विरोध करु नये.  श्रेय कुणीही घ्या, पण विकास कामे होवू द्या. राजकीय खेळामुळे कोपरगावचे वाटोळे झाले, आता पुन्हा  होवू नये असे म्हणत वहाडणे यांनी तालुक्यातील नेत्यांवर निशाण साधला.