कोपरगाव प्रतिनिधी, दि.१२ : कोपरगाव नगरपालिकाच कर्मचारी स्व. शंकर विठ्ठल ढोबळे यांच्या पत्नी छबुबाई (मालनबाई) शंकर ढोबळे यांचे वृद्धापकाळाने शुक्रवार ६ ऑक्टोबर रोजी वयाच्या ८२ वर्षी निधन झाले. त्यांच्या पाश्चात्य दोन मुलं, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. स्व. छबुबाई यांच्या पार्थिवावर कोपरगाव येथील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. स्व छबुबाई ह्यांचे माहेर नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव होते. स्व. छबुबाई ह्या अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. संपूर्ण कुटुंबाला त्यांची मोलाची साथ लाभली होती. त्यांच्या निधनाने ढोबळे परिवारासह नातेवाईक मिञपरिवारामध्ये शोककळा पसरली आहे.
- पतसंस्थांच्या विविध प्रश्नांबाबत सहकार मंत्र्यांच्या बैठकीत सकारात्मक निर्णय
- शेवगाव पंचायत समिती द्वारे अमृत कलश यात्रा उत्साव संपन्न