शेवगाव प्रतिनिधी, दि. २२ : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन सहा महिण्यापासुन फरार असलेल्या आरोपीला शेवगाव पोलीसांनी गजाआड केले आहे. या संदर्भात सविस्तर वृत्त असे की, यातील पिडीतेच्या फिर्यादीवरुन दि. २५ सप्टेबर २०२४ रोजी सायंकाळी ६ चे सुमारास यातील आरोपीत संदिप माणिक सरसे रा. खरडगाव ता. शेवगाव जि.अहिल्यानगर त्याचे मोबाईल वरुन पिडितेस फोनवर मला तुला भेटायचे आहे असा मेसेज देऊन रात्री दहाचे सुमारास पिडीतेच्या घराचे काही अंतरावर असलेल्या बौध्द समाज मंदीराचे आवारात भेटण्यासाठी बोलावुन घेतले.

आरोपी संदिप सरसे याने पिडितेच्या आई वडिलांना जिवे ठार मारण्याची धमकी देवुन पिडितेची ईच्छा व संमती नसतांना देखील त्याने बळजबरीने शारिरीक संबंध करुन झालेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या घरच्यांना कायमचे संपवुन टाकीन अशी धमकी देवुन पळुन गेला वगैरे मजकुराची फिर्याद शेवगांव पोलीस स्टेशन मध्ये विविध कलमासह बाल लैगीक अत्याचार अधि. ४, ८, १२ प्रमाणे दि. २६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्यातील आरोपी हा गेले सहा महिण्यापासुन त्याचे वास्तव्याचे ठिकाण बदलुन नाशिक, पुणे, सातारा, सांगली, गुजरात येथे राहत होता. शेवगावपोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, या गुन्ह्यातील आरोपी संदिप माणिक सरसे हा सुपा ता. पारनेर जि. अहिल्यानगर येथुन जाणार असल्याची माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक नागरे यांनी पोलीस पथक तयार करुन त्याचा शोध घेणेकामी रवाना केले.

सुपा टोल नाका येथे सापळा लावुन नमुद आरोपी संदीप माणिक सरसे वय-25 वर्षे रा. खरडगाव ता. शेवगाव जि. अहिल्यानगर हा पुण्याकडे जात असतांना सुपा टोल नाका ता. पारनेर येथे त्यास शिताफिने पाठलाग करुन ताब्यात घेण्यात आले. त्यास येथे आणुन नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आली.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला अहिल्यानगर, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. नागरे, पोहेकाँ किशोर काळे, पोहेकॉ चंद्रकांत कुसारे, पोकॉ शाम गुंजाळ, पोकॉ संतोष वाघ, पोकाँ प्रशांत आंधळे, पोकाँ संपत खेडकर तसेच नगरदक्षिण सायबर सेलचे पोकाँ राहुल गुड्डु व पोकाँ नितीन शिंदे यांनी केली असुन वरिल गुन्ह्यांचा तपास पोनि नागरे हे करत आहेत.
