पोहेगाव येथे घनकचरा व सांडणपाणी व्यवस्थापन कामाचा भूमिपूजन शुभारंभ संपन्न

 कोपरगाव प्रतीनिधी, दि. ३ : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण कार्यक्रमांतर्गत कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव ग्रामपंचायतीस घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करीता ५१ लाख १८ हजार ११० रुपयांचा निधी जिल्हा परिषद, अहमदनगर यांचेकडून मंजूर झालेला असून या कामाचा भूमिपूजन शुभारंभ सरपंच अमोल औताडे यांचे शुभाहस्ते करण्यात आले.

घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या योजने अंतर्गत सार्वजनिक कंपोस्ट खड्डे तयार करून गांडूळ खत निर्मिती प्रकल्प तयार करणे, सार्वजनिक बायोगॅस प्रकल्प तयार करणे, मलनिस्सारण प्रकल्प तयार करणे, सांडपाणी व्यवस्थापन व त्यावरील प्रक्रिया करून सांडपाण्याचा पुनर्वापर वापर करणे, ग्रामपंचायत हद्दीमधील कचरा गोळा करून त्यावर अंतिम प्रकिया करण्यात येऊन पुनर्वापर होण्यासारख्या वस्तुंचा वापर करून घनकचऱ्याची निर्मिती किमान होईल तसेच सांडपाण्याचा पुनर्वापर करून परसबाग व शेतीसाठी पाण्याचा वापर करणे इत्यादी कामांची अमलबजावणी करता येणार असून सदर कामाचे योग्य नियोजन नितीन औताडे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असल्याचे सरपंच अमोल औताडे यांनी सांगितले.

या कामाचे निधी मंजुरी साठी कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांचे विशेष मार्गदर्शन लाभल्याने सरपंच अमोल औताडे यांनी ग्रामस्थांचे वतीने आभार व्यक्त केले. याप्रसंगी उपसरपंच प्रशांत रोहमारे, ग्रा.पं.सदस्य निखील औताडे, कृष्णा औताडे, शिवाजी जाधव, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र टिळेकर, ठेकेदार राजेंद्र बेलदार, इंजिनिअर दिपक औताडे, अकींत औताडे, रावसाहेब गायकवाड, अशोक भडांगे, दिलीप भालेराव, सतिश आनप आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.