महात्मा फुले पाणी वापर संस्थेची निवडणूक बिनविरोध

शेवगाव प्रतिनिधी, दि ८ : तालुक्यातील  माझी वसुंधरा फेम वाघोली येथील मुळा पाटबंधारे विभाग उजवा कालवा माका शाखेच्या वतीने घेण्यात आलेल्या महात्मा फुले पाणी वापर संस्थेच्या पदाधिकाऱ्याची निवडणुक बिनविरोध पार पडली.

संस्थेच्या अध्यक्षपदी छाया जानदेव तुपे तर उपाध्यक्ष पदी भिमराज आल्हाट यांची तर सचिव पदी आदिनाथ जमधडे यांची एकमताने निवड करण्यात आली.

      त्यासाठी युवा कार्यकर्ते उमेश भालसिंग व ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र जमधडे, शेषराव जमधडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुभाष दातीर, ॲड. गोरक्षनाथ जमधडे, सोपानराव जमधडे, जगदीश जमधडे, आप्पासाहेब जमधडे, महादेव मिसाळ, विठ्ठल जमधडे, अशोक जमधडे, तुकाराम बोरुडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

पदाधिकाऱ्याच्या निवडी नंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राजेंद्र जमधडे म्हणाले, संस्थेचे सर्व सभासद व लाभार्थी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली. यापुढे सर्व सभासद व शेतकरी यांना समान हक्काने पाणी वितरण केले जाईल व संस्थेचा कारभार स्वच्छ व पारदर्शक ठेवला जाईल.