शॉर्टसर्किट झाल्याने सात एकर ऊस जळून खाक

शेवगाव प्रतिनिधी, दि.०५ : तालुक्यातील दहिगावने शिवारातील उसाच्या फडाजवळून जाणाऱ्या महावितरणाच्या ट्रान्सफॉर्मर मध्ये बिघाड झाल्याने शॉर्टसर्किट दोरुन लागलेल्या आगीत सात एकर ऊस आगीच्या भक्ष्य स्थानी पडला. लाखो रुपयाचे नुकसान झाले.

दहिगावने येथील विनयनाथ पाऊलबुद्धे यांचा व गीतनाथ पाऊलबुध्दे यांचा प्रत्येकी तीन एकर २० गुंठे असा एकूण सात एकर ऊस जळून खाक झाला. मंगळवारी शेता शेजारील ट्रांसफार्मरचा मोठा आवाज होऊन उसाच्या शेतावरून जाणाऱ्या विद्युत वाहक तारा उसात पडून ऊस पेटला.

आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले गेले. मात्र, आग आयोक्यात आणणे शक्य झाले नाही, लाखो रुपयाचे नुकसान झाले. या संदर्भात दहिगावनेचे उपसरपंच राजाभाऊ पाऊलबुद्धे यांनी महावितरणने या उसाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.