प्राचार्या मंजुषा सुरवसे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १: शहरातील रयत शिक्षण संस्थेचे डॉ. सी.एम. मेहता कन्या विद्या मंदिराच्या प्राचार्या मंजुषा सिद्धेश्वर सुरवसे या रयत शिक्षण संस्थेच्या 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाल्या या निमित्ताने शाळेच्या वतीने त्यांचा सेवापुर्ती व सत्कार सोहळा आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते  माजी नगराध्यक्ष पदमाकांत कुदळे यांच्या अध्यक्षतेखाली कलश मंगल कार्यालयात संपन्न झाला.

या सोहळ्याप्रसंगी शाळेच्या स्थानिक स्कूल कमिटीच्या सदस्या पुष्पाताई अशोकराव काळे, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, संस्थेचे जनरल बॉडी सदस्य कारभारी आगवन अरुण चंद्रे बाळासाहेब कदम,मच्छिंद्र रोहमारे कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे व्हा.चेअरमन दिलीप बोरनारे, पराग संधान, विधिज्ञ अशोक टुपके, स्वप्नजा वाबळे, धरम बागरेचा, माधुरीताई गिरमे, बाळासाहेब नरोडे, रयत सेवक बँकेचे चेअरमन नंदकिशोर गायकवाड, बलराम शिखरे, सिद्धेश्वर सुरवसे, रमेश सुरवसे, रामचंद्र शिखरे, बाबुराव लामतुरे, सुभाष कांबळे, तुषार जगताप, विलास वाघमारे, गौरव शिखरे, मृणाल सुरवसे,आदिसह मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरवात कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी आमदार आशुतोष काळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, सौ. सुरवसे ताई यांनी सहा वर्षाच्या कालावधीत शाळेत अटल टीकरिंग लॅब, संरक्षण भिंत, वर्गात फॅन, पाणी शुद्धीकरण यंत्र, यासह शाळेच्या गुणवत्तेत वाढ विविध स्पर्धेत नावीन्यपूर्ण यश संपादन करून शाळेचे नाव लौकिक करून शाळेस अनेक पुरस्कार मिळवून दिले तसेच त्यांच्या कार्याची अनेक संस्थेने दखल घेऊन त्यांनादेखील तालुक्यापासून गोवा सरकार व भारत सरकारचा भारत भूषण सन्मान पुरस्काराने सन्मानित केले याचा संस्थेसह आम्हाला अभिमान आहे म्हणून सौ. सुरवसे ताई यांचा सत्कार करताना आम्हाला विशेष आनंद वाटतो.

सत्काराला उत्तर देताना सौ. मंजुषा सुरवसे म्हणाल्या की, माझ्या शाळेतील शैक्षणिक काळात मला संस्थेचे आजी माजी अधिकारी, पदाधिकारी यांचे मार्गदर्शन व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले त्यामुळे मी कार्य करु शकले. त्यांचे फलित म्हणून शाळेसह मला देखील अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, हे यश माझे एकट्याचे नसून शाळेतील सर्वच सहकार्याचे आहे. मला मिळालेले पुरस्कार मी कर्मवीर अण्णांच्या चरणी समर्पित करते.

याप्रसंगी अनेक मान्यवारांनी सेवापूर्तीच्या निमित्ताने सौ. मंजुषा सुरवसे यांचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी  स्थानिक स्कूल कमिटी सल्लागार समिती, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, पर्यवेक्षक व सेवक वृंद यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण निळकंठ यांनी केले. सूत्रसंचालन किरण चांदगुडे तर आभार पर्यवेक्षक सुभाष सोनवणे यांनी मानले.