कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागातील शासकीय जागेवर वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना त्या जागेचे त्यांच्या नावाचे उतारे मिळावे अशी या नागरिकांची मागील अनेक वर्षापासूनची मागणी होती. याबाबत मागील तीन वर्षापासून करीत असलेल्या पाठपुराव्याला यश मिळून या नागरिकांना त्यांच्या हक्काच्या जागेचे उतारे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला याचे मोठे समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
लक्ष्मीनगर भागातील शासकीय जागेवर वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांनी आ.आशुतोष काळे यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले. यावेळी सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले कि, कोपरगाव शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत असल्यामुळे शहराच्या लक्ष्मीनगर परिसरात मागील अनेक वर्षापासून असंख्य नागरिकांचे शासकीय जागेवर वास्तव्य होते. यापैकी बहुतांश नागरिकांनी या शासकीय जागेवर पक्की घरे बांधलेली होती त्यामुळे त्यांच्या जागा नियमाकुल करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत होतो.
त्या पाठपुराव्याला नुकतेच पुणे नगररचना संचालक, अविनाश पाटील यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसाद दिला असून या नागरिकांना लवकरच त्यांच्या जागेचे उतारे मिळणार आहे. त्यामुळे या नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद सुखावणारा व समाधान देणारा असून यापुढील काळात केल्या जाणाऱ्या विकासकामांना उर्जा देणारा असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी महात्मा गांधी चॅरीटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते व माजी नगरसेवक विरेन बोरावके, नगरसेविका सौ. माधवी वाकचौरे, राजेंद्र वाकचौरे, सलीम पठाण, डॉ. तुषार गलांडे, ठकाजी लासुरे, शुभम लासुरे, दीपक पंजाबी, शिवा सलगर, संतोष शेलार, अक्षय पगारे, अक्षय जाधव, सौ. ज्योती पांडे, डॉ. वर्षा रोकडे, सौ. छाया फरताळे आदी मान्यवरांसह लक्ष्मीनगरचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.