निर्भय कन्या अभियान एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

शेवगाव प्रतिनिधी, दि. २१ : येथील न्यू आर्टस् कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालय, विद्यार्थी विकास मंडळ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ निर्भय ‘  कन्या अभियान एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.  औरंगाबादच्या अॅड. ऋतिका पटेल यांनी कार्यशाळेचे उद्घाटन करून ‘कायदा आणि महिला सबलीकरण ‘ या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

   अॅड पटेल म्हणाल्या, महिलाविषयक वाढते गुन्हे आणि  त्यांच्या होणाऱ्या फसवणूकीच्या  प्रकारामुळे  महिलांना कायद्याची माहिती असणे  ही काळाची गरज आहे. असे सांगून माहिला संदर्भातील विविध कायद्याची सविस्तर माहिती दिली. येणाऱ्या संकटाना हार न मानता संकटांना सामोरे जातांना स्त्री अबला नसून सबला आहे. हे प्रतित होऊ द्या. असे आवाहन करुन स्वतःचे काही अनुभव देखील त्यांनी यावेळी शेअर केले.

प्रथम सत्रात शेवगाव येथील आयुर्वेद महाविद्यालयातील पूजा खोले यांनी, ‘महिलांचे आरोग्य व समस्या ‘ या विषयावर बोलतांना महिलांचा आहार, व्यायाम, दिनक्रम कसा असावा याबद्दल  मार्गदर्शन केले.  द्वितिय सत्रात मुस्ताक शहा यांनी, ‘महिला स्वसंरक्षण काळाची गरज ‘ याविषयावर  बोलतांना त्यांनी कराटे, कुंफू व स्वसंरक्षणाची प्रात्याक्षिके देखील करून दाखविली.

यावेळी डॉ. युवराज सुडके, डॉ. रविद्र वैद्य, डॉ. छाया भालशंकर, डॉ. उषा शेरखाने, सर्व महिला प्राध्यापिका, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे अध्यक्ष स्थानी होते. विद्यार्थी विकास मंडळाचे  डॉ. गोकुळ शिरसागर यांनी प्रस्तावित केले. प्रा. अपर्णा वाघ यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. मिनाक्षी चक्रे यांनी आभार मानले.