अमरापूर देवस्थान येथे शाकंभरी नवरात्रोत्सवास प्रारंभ

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि. २२:  साडेतीन शक्ती पिठापैकी माहूरगड निवासीनी श्री रेणुकामातेचे प्रतिरुप म्हणून लौकिक पावलेल्या श्री क्षेत्र अमरापूर येथील श्री रेणुकामाता देवस्थानात सोमवार (दि २०) गोपाष्टमी पासून शाकंभरी नवरात्रोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून १५ दिवसाच्या या नवरात्रोत्सवाची मंगळवार दिनाक ५ डिसेंबरला, कालभैरव जयंतीला त्याची सांगाता होणार आहे.

Mypage

यानिमित्त सोमवारी सकाळी सातला श्री रेणुका आईसाहेबांना दुधाचा रुद्राभिषेक करण्यात आला.  नवरात्रोत्सवाच्या काळात पंधरा दिवस आईसाहेबांना आता स्नान व अभिषेक घातला जात नाही. मात्र, महानैवद्य, महाआरती, सप्तशती पाठ व रोजच्या रोज नवीन आकर्षक शृंगार असे विधी नियमित साजरे केले जात आहेत.

tml> Mypage

देवस्थानचे पुजारी तुषार देवा व ब्रम्हवृंद या सर्व पुजाविधी करत आहेत. कालभैरव जयंतीच्या दुसऱ्या दिवशी, नवमीला बुधवारी दि.६ डिसेबरला सकाळीच आईसाहेबांना स्नान व अभिषेक घालून घोटलेल्या दूधाचा प्रसाद भाविकांना दिला जाणार आहे. श्री क्षेत्र माहूर येथील रुढी परंपरा व प्रथेप्रमाणेच सर्व विधी येथील श्री रेणुकामाता देवस्थानात केल्या जातात.

Mypage

येथे गोपाष्टमी ते काल भैरव जयंती या कालावधीत शाकंभरी नवरात्रोत्सव साजरा केला जातो. तरी भाविकांनी उत्सव काळात श्री रेणुका आईसाहेबांच्या  दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन रेणुका भक्तानुरागी मंगल चंद्रकांत भालेराव यांनी केले आहे.

Mypage