संजीवनी शिक्षण संस्था व उद्योग समुहाच्यावतीने पञकार दिन साजरा
कोपरगाव प्रतिनिधी दि. ७ : संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस् सारखी शैक्षणिक संस्था ही या भागातील ज्ञानगंगा आहे. जिथे शिक्षणाची ज्ञानगंगा असते त्या भागातील विकासाला चालना मिळते व तेथील अर्थचक्र गतीमान होते असे मत पञकार प्रसन्ना जोशी यांनी व्यक्त केले.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस् व संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने पञकार दिनानिमित्ताने शुक्रवारी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस् च्या सभागृहात पञकारांचा सन्मान सोहळा आयोजन करण्यात आला होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून साम टीव्हीचे कार्यकारी संपादक व जेष्ठ वृत्तनिवेदक प्रसन्ना जोशी होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार स्नेहलता कोल्हे होत्या. यावेळी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस् चे अध्यक्ष नितीन कोल्हे, व्यवस्थापकीय संचालक अमित कोल्हे, संचालक सुमित कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोपरगाव तालुक्यासह शिर्डी, राहता तालुक्यातील शेकडो पञकारांचा सन्मान कोल्हे परिवार तसेच संजीवनी शिक्षण संस्था व उद्योग समुहाच्यावतीने करण्यात आला. यावेळी उपस्थित पञकारांना मार्गदर्शन करताना वृत्तनिवेदक प्रसन्ना जोशी पुढे म्हणाले की, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस् हि शैक्षणिक संस्था येत्या पाच दहा वर्षात देशातील नामांकीत स्वतंत्र विद्यापीठ म्हणून नावारुपाला येवू शकते. येथे देशाच्या कानाकोपऱ्यातील मुलं शिक्षण घेण्यासाठी येतात. उत्कृष्ट नियोजन निकालाची उज्ज्वल परंपरा, अद्यावत सर्व यंञणा असणारी हि शैक्षणिक संस्था आहे.
माजी मंञी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या दुरदृष्टी विचारधारेमुळे हि शिक्षण संस्था उभी करुन या भागात ज्ञानगंगा आणली आहे. त्यामुळेच या भागाच्या आर्थीक विकासाचे चक्र गतीमान होत आहे. एक चांगले शैक्षणिक संकुल उभे राहीले तर त्या भागाचा कायापालट होवून आर्थीक साखळी बळकट होते. ग्रामीण भागातील बदलावर शहराचे बदल घडतात. ग्रामीण भागातील पञकारांच्या पञकारीतेचे तरंग मोठ्या शहरापर्यंत पोहचवण्याचे काम करीत असतात.
ग्रामीण भागातील पञकारांना निश्चित पगार नसतो, नोकरीची हमी नाही, उत्पन्नाचा शाश्वत श्रोत नसतानाही. तळागाळातील गावखेड्याच्या समस्या मांडण्याचे काम ग्रामीण भागातील पञकार करतात. ग्रामीण पञकार म्हणजे मैदानावर लढणारे आहेत. पञकारीतेचा खरा आत्मा ग्रामीण भागातील पञकार आहेत असेही ते म्हणत कोल्हे परिवाराच्या कार्याचे कौतूक केले.
यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे म्हणाल्या ग्रामीण भागातील पञकांराचे लिखान लक्षवेधी असते. खेड्यापाड्यातल्या महीलांना बचत गटाच्या माध्यमातून घडवताना मलाही प्रेरणा मिळाली. महीला मंडळापासुन मी माझ्या सामाजीक कार्याला सुरूवात केली. माञ पञकारांच्या लेखणीने मला थेट विधीमंडळापर्यंत पोहचवले. पण सध्याची परिस्थिती बदलत चालली आहे. नको त्या गोष्टीला खतपाणी दिले जाते. राजकारणी मंडळी पातळी सोडुन बोलतात आणि माध्यमातुन त्याला खतपाणी घातले जाते. किती खतपाणी घालावे ही काळाजी गरज आहे.
काळानुसार राजकारणी व पञकारामध्ये बदल होणे आवश्यक आहे. राजकीय नेत्यांमध्ये वैचारीक समृध्दी वाढण्याऐवजी विकृती वाढत चालली आहे. प्रसार माध्यमांनीही निरर्थक दाखवण्यात काहीच अर्थ नाही. नव्या पिढीने काय आदर्श घ्या. जबाबदार व्यक्तीने जबाबदारीने बोलले पाहीजे आणि लिखाण करणाऱ्यांनी व इतर माध्यमांनीही जबाबदारी पाळली पाहीजे.
पारंपारीक पञकारीता करण्यापेक्षा नवीन पञकारीता करणे काळाची गरज आहे. गल्लीतल्या लहान मुलासारखे वरिष्ठ पातळीवरचे नेते बोलत असतात अशी खंत कोल्हे यांनी व्यक्त करीत राजकीय आरोप प्रत्यारोप करणाऱ्या नेत्या बद्दल नाराजी व्यक्त केली.
यावेळी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस् च्या सर्व विभागाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पञकारांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. साहेबराव दवंगे यांनी केले.
तान्हुबाई बिर्जे पहील्या महीला संपादक यांचा कुठेही अपेक्षित उल्लेख होत नाही किंवा यांच्या नावाने एखादा पुरस्कार नाही अशी खंत प्रसन्ना जोशी यांनी व्यक्त केली. यावर स्नेहलता कोल्हे यांनी सांगितले की, मी यासंदर्भात वरीष्ठ पातळीवर चर्चा करुन योग्य तो पाठपुरावा करुन पहील्या महीला संपादक तान्हुबाई बिर्जे यांच्या नावाने पुरस्कार घोषित करण्याची व्यवस्था करणार असल्याचे सांगितले.