आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उद्योजकांनी दर्जेदार उत्पादने निर्माण करावे – बिपीनदादा कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ :  शिंदे फडणवीस शासनाने नव्याने निर्मित केलेला हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला गती देणारा असून येथील औद्योगिक वसाहती मधील उद्योजकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून दर्जेदार उत्पादन निर्मिती करावी व असे प्रतिपादन  संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी दिली.

येथील औद्योगिक सहकारी वसाहतीत  तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या विशेष प्रयत्नाने शासनाच्या सन २०१८-१९ मधील ग्रामविकास निधीतून सुमारे 36 लाख रुपये खर्च करून बांधलेल्या नूतन सामाजिक सभागृहाचे व सव्वा दोन लाख रुपये खर्चाचे पिण्याचे पाणी शुद्धीकरण प्लांटचे  लोकार्पण बुधवारी करण्यात आले त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. प्रारंभी औद्योगिक वसाहत सोसायटीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी उपस्थितांचे  स्वागत करून कोपरगाव औद्योगिक वसाहतीच्या विविध विकास कामांची व भविष्यात होणाऱ्या प्रकल्पांची माहिती दिली.

महानंदाचे अध्यक्ष राजेश् परजणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाविस्कर (अहमदनगर), संगमनेर विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. वर्पे, उपविभागीय अभियंता व्ही. बी. शिंदे, प्रशांत वाकचौरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अतुल दवंगे, कोपरगाव पीपल्स बँकेचे अध्यक्ष कैलास ठोळे, माजी अध्यक्ष राजेंद्र शिंदे, उपाध्यक्ष मुनिश ठोळे, संचालक पराग संधान, केशवराव भवर, अनिल सोनवणे, रवींद्र नरोडे, रोहित वाघ, सुकृत शिंदे, पंडित भारूड, सोमनाथ निरगुडे, वसंतराव देशमुख, जयवंत जाधव, बाबासाहेब परजणे, बाजार समितीचे खंडू फेफाळे,  दिलीप ढेपले, बाळासाहेब दहे पाटील, यांच्यासह सर्व उद्योजक, कारखानदार आदी उपस्थित होते.

    बिपिनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, सुरत-हैदराबाद महामार्गही आपल्या परिसरातून जात आहे. काकडी विमानतळ, नगर मनमाड दुहेरी रेल्वे मार्ग  येथून जवळच आहे. भारत देश पुन्हा एकदा नवीन औद्योगिक क्रांतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. येथील उद्योजकांनी जागतिक स्थित्यंतराचा अभ्यास करून बदलत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे. 

स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी उद्योगवाढी बरोबरच सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करून मतदारसंघाचा कायापालट केला. सूत्रसंचालन प्रा. साहेबराव दवंगे यांनी तर आभार प्रदर्शन पंडितराव भारूड यांनी केले.

             उद्योग-व्यवसाय करताना प्रत्येकाने बाजार शास्त्र जाणून घेऊन त्याप्रमाणे उत्पादनांचे विपणन केले पाहिजे., त्यातून ग्राहकांपर्यंत आपले काम व उत्पादन पोहोचविता येते, उद्योग-व्यवसाय वाढवता येतो, असे स्नेहलता कोल्हे म्हणाल्या.