शेवगावात नेपियर हत्ती गवतापासून नैसर्गिक कोळशाची निर्मिती

शेवगाव प्रतिनिधी, दि. २५ : तालुक्यात काही तरुणानी आधुनिकतेची कास धरली आहे. मोठ्या प्रमाणात रोजगार  निर्मितीसह सन२०३० पर्यंत इंधन मुक्त भारत ही संकल्पना राबविव्याचा वसा त्यांनी घेतला. त्यातूनच नेपियर हत्ती गवतापासून नैसर्गिक कोळसा उत्पादनाचा प्लांट उद्या गुरुवारी दुपारी २.वा. २६ जानेवारीच्या मुहुर्तावर तालुक्यातील तळणी येथे पहिल्या कारखान्याच्या कामाचा शुभारंभ आखेगावच्या जोग महाराज संस्कार केंद्राचे प्रवर्तक राम महाराज झिंजुर्के यांचे हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे.

    या नैसर्गिक कोळस्यापासून प्रदूषण होणार नाही. दगडी कोळसा, फरनेस ऑइल, LDO पद्धतीच्या जीवाष्म इंधनाला इकोफ्रेंडली पर्याय आहे. तो लाईट निर्मिती, फौंड्री व्यवसाय, हॉटेल व्यवसाय, औद्योगिक वसाहती, कापड उद्योग आदीसाठी उपयुक्त असणार आहे.

जैव इंधन निर्मिती, सेंद्रिय खत निर्मिती, इकोफ्रेंडली प्रॉडक्ट, सेंद्रिय शेती या क्षेत्रास उपयुक्त असून तळणी गावाच्या परिसरात सभासद शेतकऱ्यांचे नेपिअर गींनी गवत प्लँटसाठी हमीभावाने खरेदी केले जाणार आहे, मीरा क्लीन फ्युएल लि. व ग्रिन गोल्ड ऑरगॅनिक फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या सहकार्यातून हा ग्रामोद्योग आकाराला येत  आहे.

     रोज १०० टन नेपिअर गवताची या प्लांट मध्ये प्रक्रिया होणार असून त्यापासून ३० टन नैसर्गिक कोळसा तयार होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ संचालक दत्ता फुंदे, रंजीत दातीर, गजानन भोगे व  राजेंद्र गायकवाड, भाऊसाहेब पाचरणे यांचे योगदान त्यासाठी लाभले आहे.