इंदिरापथ रस्ता दर्जाहीन केल्याच्या चर्चेला आले उधान

शहरातला महत्वाचा मुख्य रस्ता आजून अरूंदच का? 

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. १४ : शहरातील अतिशय वर्दळीचा आणि रहदारीचा महत्वाचा रस्ता म्हणजे छञपती संभाजी महाराज पुतळा ते गोकुळनगरी, मार्कट यार्ड पर्यंतच्या या महत्वाच्या रस्त्याची गेल्याअनेक वर्षापासुन दैनिय अवस्था झाली होती. खड्ड्यात रस्ता की, रस्त्यात खड्डा हेच कळत नव्हते अनेकवेळा नागरीकांनी या रस्त्याच्या संदर्भात अंदोलने केली, निवेदने दिल्यानंतर कसा तरी पालीकेने रस्त्याचे काम सुरु करण्याचे आश्वासन देताना हा रस्ता सर्वात मोठ्या रुंदीचा व मजबुत करणार असे सांगितल्याने या रस्त्याची उत्कंठा वाढली.

शहराच्या वैभवात भर टाकणारा रस्ता होवून शहराला पर्यायी मोठा रस्ता मिळेल असे वाटले होते, माञ प्रत्यक्षात तसे काहीच दिसत नाही. नव्याने जो रस्ता केला तोही पुर्ण केला नाही. छञपती संभाजी महाराज पुतळ्या पासुन केवळ गोकुळनगरी पर्यंत केला. त्या रस्त्याला कोणतीही ज्या प्रमाणात मजबुत करायला हवे होते तसे झाल्याचे दिसत नाही. रस्त्यांच्या दोन्ही बाजुचे अतिक्रमण काढले नाही. या भागातील उच्चभ्रूंचे बंगले आहेत. ज्यांचे राजकीय, सामाजीक, व्यवसायीक मोठेपणा आहे, अनेक प्रसिद्ध डॉक्टरांचे मोठमोठे खाजगी दवाखाने आहेत. या पैकी एकाच्याही अतिक्रमणाला धक्का न लावता पालीका प्रशासनाने त्यांच्यावर दया दाखवून नियोजित रस्त्यात बदल करीत १८ मिटर रस्त्यावर केवळ १० मिटरचा कसा बसा रस्ता करुन उच्चभ्रूंच्या केसालाही धक्का लागणार नाही याची दक्षता घेतली.

पालीका प्रशासनाने रस्त्याच्या मधोमध आलेले विजेचे खांब सुध्दा काढण्याची तसदी घेतली नाही. भले सर्वसामान्य नागरीकांना ञास झाला तरी चालेल पण मोठ्यांना ञास होणार नाही याची काळजी घेतल्याचे या झालेल्या रस्त्यावरुन दिसते. इंदिरापथ या मुख्य रस्त्याचे टेंडर २५ जानेवारी २०२२ मध्ये काढण्यात आले. एक कोटी रुपये खर्च करुन हा रस्ता करण्यात आला. रस्ताचे काम सहा महीण्यात पुर्ण करण्याचे ठरलेले असताना संबधीत ठेकेदाराने त्या कामाला एक वर्ष लावले.

या पुर्वीचा हा रस्ता केवळ ६ मिटर रुंदीचा होता तो वाढवण्याच्या नावाखाली १० मिटर केला परंतू काही ठिकाणी १० मिटर काही ठिकाणी दहा पेक्षा कमी करुन ठेकेदाराने कमाल केली. १० मिटर रुंद व ८०० मिटर लांबीच्या रस्त्यासाठी पालीकेला एक कोटी मोजावे लागले. रस्ता दर्जेदार झाला की नाही याचा शासकीय अहवाल येण्या अगोदरच संबधीत ठेकेदाराला ७१ लाख रुपये देण्यात आले. एस. के. येवले या संगमनेरच्या ठेकेदाराने या रस्त्याचे काम नियमाप्रमाणे पुर्ण केल्याची माहीती मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी दिली.

ते पुढे म्हणाले हा रस्ता अतिशय दर्जेदार झाला असुन उलट चार मिटरने वाढवला आहे. साईडने त्याला मुरुम टाकण्यात आला आहे., बाॅक्स फिलींग, डब्ल्यू बी.एम, ग्रेड वन व ग्रेट टू या सर्व प्रकारचे थर देण्यात आले सोबतच ७५ एमएम बीबीएम, ५० एम एम बीएम, तसेच सिलकोटसह सध्या काम पुर्ण झाले आहे. पुण्याच्या शासकीय तंञनिकेतन महाविद्यालयाच्यावतीने ञयस्त तांञिक परीक्षण अर्थात गुणवत्ता चाचणी केल्याचे सांगुन मुख्याधिकारी गोसावी यांनी रस्त्याच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

 दरम्यान या भागातील नागरीकांनी माञ हा रस्ता पुर्णपणे दर्जाहीन केला असुन कुठूही त्याची समान पातळी दिसत नाही. ओबडधोबड रस्ता करण्यात आला. रस्त्यावरची धुळ व्यवस्थित साफ केली नाही, अनेक ठिकाणी विनाकारण गतीरोधक टाकले, रस्ता बनवताना किमान पुर्वीचा खराब रस्ता पुर्ण खोदुन त्यावर मजबुतीकरण करणे आवश्यक असताना तसे केले नाही. एका राञीत एक एक थर देण्याचा अजब प्रकार केल्याचे अनेकांनी बोलुन दाखवले.

गोकुळनगरीच्या पुढे मार्केटयार्ड निवारा भागाकडे जाताना भलेमोडे खड्डे आजुनही तसेच आहे. पालीका प्रशासनाने अर्धवट रस्ता करून नागरीकांच्या जीवाशी खेळत आहे अशी प्रतिक्रिया एका माजी नगराध्यक्षांनी दिली. मार्केट यार्ड समोरील रस्ता असुन नसल्यासारखाच आहे. धुळीचे साम्राज्य असलेला हा रस्ता नागरीकांच्या आरोग्यासाठी घातक झाला आहे. हा रस्ता लवकरात लवकर पुर्ण झाला पाहीजे अशी मागणी नागरीकामधुन होत आहे. दर्जाहीन रस्त्यामुळे पालीकेचा पैसा आणि नागररीकांचे आरोग्य दोन्ही नुकसानीत आहे.

रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली शहरातील या महत्त्वाच्या रस्त्यावरील मोठमोठ्या वृक्षांची कत्तल पालीकेने केली पण अपेक्षित रस्ता रुंद झालाच नाही अशा तक्रारी नागरीक आता करीत आहेत. शहराला पुर आला किंवा बसस्थानक परीसरात वाहतुकीची कोंडी झाली किंवा एखादा मोठा कार्यक्रम असला तरी पर्यायी रस्ता म्हणून इंदिरापथ रस्ता वापरला जातो. शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या रस्त्यावर कशी बशी खडी, डांबर टाकुन रंगवण्यात काहीच अर्थ नाही अशी खंत नागरीकांनी व्यक्त करीत रस्त्याच्या गुणवत्तेवर शंका निर्माण करीत आहेत.