महिला बचत गटा बरोबरच महिलांचे परिसराच्या विकासात महत्वपूर्ण योगदान –  राजश्री घुले

शेवगाव प्रतिनिधी, दि.१३ :  येथील संपूर्ण परिसर आपले कुटूंब असल्याची शिकवण लोकनेते स्व. मारुतराव घुले यांनी दिली असल्याने त्यांच्या शिकवणुकीनुसारच घुले कुटूंबियाची कार्य पद्धती राहिली आहे. सत्ता असो वा नसो अडचणीच्या वेळी जनतेच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याची माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची भूमिका आहे.

तालुक्याचा हक्काचा लोकप्रतिनिधी नसल्याने सर्वच क्षेत्रात तालुक्याची पिच्छेहाट झाली असल्याने येत्या निवडणुकीत जनता योग्य निर्णय घेईल व त्यात महिलांचा अतुलनिय सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राजश्री घुले यांनी केले.

तालुक्यातील मुंगी येथे मंगळवारी महिलांसाठी पार पडलेल्या हळदी कुंकू व आनंद मेळाव्यात घुले बोलत होत्या. त्यापुढे म्हणाल्या, ग्रामीण परिसरातील महिलांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून आपल्या कुटूंबा बरोबरच परिसराच्या विकासात महत्वपूर्ण योगदान दिले आहे.

ग्रामिण परिसरातील महिलामध्ये संक्रातीच्या सणाच्या निमित्ताने वैयक्तिक संपर्काबरोबरच आजही हळदी कुंकवाची परंपरा आहे. परिसरातील महिलांनी वैयक्तिक आरोग्य व कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीत आपल्या योगदानाच्या माध्यमातून दक्ष रहाणे आवश्यक आहे.

यावेळी सरपंच ललिता ढमढेरे, उपसरपंच वंदना घोटाळे, पल्लवी काटे, रुपाली सरोदे, अंबिका मातोडे, संगिता रक्टे, सविता गायकवाड, पुष्पा दसपुते, गंगुबाई गव्हाणे, ज्योती ढमढेरे, माधुरी राजेभोसले, उषा राजेभोसले, मंगल ससाणे, शारदा दसपुते यांचे सह महिलां मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.