आत्मामालिक हॉस्पिटलने मंडवाई यांना दिला आधार

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : पाठीचा कणा एका बाजूने वक्र असणे किंवा “S” किंवा “C” आकारात असल्यास तुम्हाला स्कोलियोसिस होऊ शकतो. स्कोलिओसीस हा एक मणक्याचा गंभीर आजार आहे. टाकळी तालुका निफाड येथील ६१ वर्षीय हरिभाऊ मंडवाई हे या आजाराने त्रस्त होते. गेली ५ महिन्या पासून त्यांना मणक्याचा त्रास होता. त्यामुळे त्यांचे चालणे देखील बंद झाले होते. ते आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले. आत्मा मलिक हॉस्पिटल मधील तज्ञ  डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरु करून त्यांच्या योग्य त्या तपासणी करून त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला.

मंडवाई हे शस्त्रक्रियेसाठी आत्मा मालिक हॉस्पिटल मध्ये दाखल झाले. पुणे, मुंबई या सारख्या मोठ्या शहरामंध्ये होणारी हि शस्त्रक्रिया डॉ. सचिन पाटील यांनी आत्मा मालिक हॉस्पिटल मध्ये केली. सुमारे ४ तास चाललेली कठीण शस्त्रक्रिया यशस्वी करून मंडवाई यांना आधार दिला आहे.

दरम्यान हरिभांऊना राज्य सरकारच्या महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यात आला. पेंशटला एकही पैसा खर्च न करता सदरची शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली. त्यामुळे गरीब व आर्थिक परिस्थिती बेताच्या असलेल्या हरिभांऊना आधार मिळाला. हि अतिशय अवघड व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असून हि सर्जरी यशस्वीरीत्या करण्यात डॉक्टर व त्यांच्या चमूला यश आले. डॉक्टरांनी केलेल्या अथक परिश्रमामुळेच हे सारे शक्य झाले. हरिभाऊ व त्यांच्या कुंटुंबियांनी डॉ. सचिन पाटील, आत्मा मालिक हॉस्पिटल स्टाफ व प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहे.