शिंगणापुरात ३२५ लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप – साहेबराव रोहोम 

Mypage

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २८ : तालुक्यातील शिंगणापुर परिसरातील ३२५ गोर गरीब स्वस्त धान्य दुकानदार लाभार्थ्यांना सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कामगारांच्या पतपेढीमार्फत चालविल्या जाणा-या स्वस्त धान्य दुकान क्रमांक दहा अंतर्गत दिवाळसणानिमीत्त शिंदे फडणवीस शासनाने दिलेल्या आनंद शिधाचे वाटप भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांच्या हस्ते नुकतेच करण्यांत आले. अध्यक्षस्थानी कोल्हे कारखान्यांचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव होते. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांची विचारधारा कायम गरीबांना मदत करण्याची राहिलेली आहे असेही रोहोम यावेळी म्हणाले.

Mypage

            प्रारंभी शिंगणापुर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. सुनिता भिमा संवत्सरकर प्रास्तविक करतांना म्हणाल्या की, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी तालुक्यावर आलेल्या प्रत्येक संकटात सर्वप्रथम मदत केली आहे. जिल्हा बँकेचे संचालक, युवानेते विवेक कोल्हे यांनी शिंगणापुर परिसरातील वंचित घटकांना दिवाळसणानिमीत्त मदत करून आनंद शिधा व्यवस्थीतरित्या वाटप होतो की नाही याबाबतची काळजी घेतली आणि या लाभार्थ्यापर्यंत हा शिधा तात्काळ उपलब्ध करून दिला.

Mypage

सहकारहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कामगार पतपेढीचे व्यवस्थापक राजेंद्र सोनवणे यांनी शिंदे फडणवीस शासनाने गोर गरीब लाभार्थ्यांना साखर, रवा, तेल आणि दाळ या चार वस्तु अवघ्या शंभर रूपयांत उपलब्ध करून देवुन राज्यात आदर्शवत दिवाळी साजरी करण्यांसाठी धाडसी पाउल उचलले आहे.

Mypage

            याप्रसंगी भाजपा तालुका सरचिटणीस दिपक चौधरी, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, कामगार सोसायटीचे संचालक राजेंद्र डमाळे, भिमा संवत्सरकर, लेखापाल अशोक भालेराव, वसंत थोरात, गोरख चोपडे व सर्व लाभार्थी उपस्थित होते. सुत्रसंचलन व आभार भाजपा तालुका सरचिटणीस दिपक चौधरी यांनी केले. 

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *