पालक आणि शाळा एकत्र आल्याने विध्यार्थी घडतात  – सुचेता कुलकर्णी

Mypage

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ९ :  संजीवनी अकॅडमीच्या टाॅडलर्स विभागातील  बाल कलाकारांनी सादर केलेले नृत्ये, गीते, नाटिका, इत्यादी मंत्रमुग्ध करणारे आहेत. प्रत्येक क्षेत्रात विध्यार्थ्यांनी राष्ट्रीय, राज्य आणि विभागीय पातळीवर मिळविलेले बक्षिसे या सर्व बाबी येथिल स्कूलच्या दर्जा व त्यातुन विकसीत होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची साक्ष देतात. एकाधिक कौशल्य (मल्टीपल स्कील्स) विकास करणाऱ्या शाळा फार थोड्या असतात. मात्र येथे पालक आणि शाळेच्या योग्य समन्वयातुन विध्यार्थी घडत आहेत, असे प्रतिपादन नाशिक येथिल कनेक्ट अकॅडमीच्या प्राचार्या व मानसशास्त्र  समुपदेशक सौ. सुचेता कुलकर्णी यांनी केले.

Mypage

संजीवनी अकॅडमीमध्ये दरवर्षी  भारतीय संस्कृतीचे प्रतिक, परंपरा  असलेल्या नवीन  संकल्पनेवरती वार्षिक स्नेहसम्मेलनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. यावर्षी  संजीवनी अकॅडमीच्या टाॅडलर्स (लहान मुलांचा विभाग) विभागाच्या ‘यक्षगणा’ या संकल्पनेवर आधारीत कार्यक्रमात कुलकर्णी या प्रमुख पाहुण्या म्हणुन बोलत होत्या. सदर प्रसंगी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, संजीवनी  ग्रुप ऑफ  स्कूल्सच्या संचालिका डाॅ. मनाली कोल्हे, योगाचार्य उत्तमभाई शहा, आदी मान्यवर उपस्थित होते.

Mypage

कुलकर्णी पुढे म्हणाल्या की, मल्टिपल इंटेलिजन्सचा विचार करून विकास करणारी संजीवनी ही परीसरातील एकमेव शाळा  आहे. यक्षगणा या संकल्पनेवर चिमुकल्यांनी छोट्या  नाटिका, नृत्य, गायन सादर केले. यावेळी तीन ते चार वर्षाच्या  चिमुकल्यांनी अस्खलीत इंग्रजी मधुन कार्यक्रमाचे निवेदन केले, तर काहींनी नाटीकांमधुन उत्तम संवाद फेक करीत रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळवुन टाळ्या मिळविल्या.

Mypage

यावर भाष्य  करताना सौ. कुलकर्णी म्हणाल्या की, येथिल शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये  ठासुन भरविलेला आत्मविश्वास  आणि घेतलेल्या कष्टाचे हे प्रतिबिंब आहे. यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांच्या सर्वागीण विकासाठी निवडलेली शाळा  योग्य आहे, येथिल विध्यार्थ्यांच्या  सर्वागीण प्रगतीवर समाधान व्यक्त करून व्यवस्थापनाचे अभिनंदन केले.

Mypage

संचालिका डाॅ. मनाली कोल्हे म्हणाल्या की, कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणासाठी पालकांनी चांगले सहकार्य केले, तसेच कोरोना नंतर प्रत्यक्ष शिक्षण  सुरू झाल्याने आता अनेक बाबींची उणिव भरून काढण्यासाठी स्कूल विशेष  प्रयत्न करीत आहे. यामध्येही पालकांचे मोठे सहकार्य मिळत आहे. वर्षभरात मुलांनी केवळ राष्ट्रीय  नव्हे तर आंतरराष्ट्रीय  स्तरावर संजीवनीचे नाव उज्वल केले आहे, यामध्ये कोडींग, क्रीडा, संगीत, नृत्य, ऑलिम्पियाड  स्पर्धांमधिल १०० पदकांची कमाई, इत्यादी बाबींचा समावेश  आहे. हे सर्व स्व. शंकरराव  कोल्हे यांच्या मार्गदर्शक  तत्वांनुसार चालु असुन त्यांनी दाखविलेल्या वाटेवर प्रवास करीत आहोत.

Mypage

योगाचार्य श्री शहा यांनी मुलांचे कौतुक करून जीवनात योगाचे महत्व सांगीतले. बालकलाकारांनी  सादर केलेल्या विविध परिकथा, उंचावर बांधलेल्या कपड्याच्या  सहाय्याने सादर केलेली अंग मेहनतीची प्रात्यक्षिके, चार वर्षांच्या  दोन मुलांनी योगाचे सादर केलेले १६ प्रकार, उत्तम रंगमंच, उत्कृष्ट  ध्वनी व्यवस्था, सादरीकरणानुसार संगीत व लायटींग आणि  प्रत्येक सादरीकरणाला उपस्थित प्रेक्षकांची मिळणारी भरभरून दाद, इत्यादी बाबी या सम्मेलनाची ठळक वैशिष्ठे ठरली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशासकिय अधिकारी प्रकाश जाधव, प्राचार्या शैला  झुंजारराव, हेड मिस्ट्रेस रेखा साळुंके, सेंटर हेड कोमल भल्ला, आदींनी विशेष परीश्रम घेतले.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *