शिंदे – फडणवीस सरकारच्या काळात सर्व कामे लागणार मार्गी – आ. राजळे

शेवगाव प्रतिनिधी, दि. ९ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे तालुक्यातील रखडलेल्या रस्त्याच्या व इतर प्रलंबित कामांसाठी समाधानकारक निधी उपलब्ध होतो आहे. त्यामाध्यमातून रस्ते, वीज, पाणी या मुलभुत गरजांना प्राधान्यक्रम देत असल्याचे प्रतिपादन आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले.

    तालुक्यातील  ढोरजळगांवने येथे विविध विकास कामाचा शुभारंभ तसेच ७० लाख खर्चाच्या मिरी शेवगांव रस्त्याचे, १७४ लाखाचा ढोरजळगांव आव्हाणे अमरापुर रस्ता, १५३ लाखाचा मिरी शेवगांव रस्त्याचा प्रारंभ, व आमदार स्थानिक विकासनिधी अंतर्गत झालेल्या १९ लाख खर्चाच्या ढोरजळगाव ग्रामपंचायत कार्यालय लोकार्पण आ राजळे यांच्या हस्ते आज गुरुवारी करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.    

      यावेळी भाजपाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे,गटविकास आधिकारी महेश डोके,तालुकाध्य ताराचंद लोढे,महिला तालुकाध्यक्ष आशाताई गरड,बापुसाहेब भोसले,बापू पाटेकर,उमेश भालसिंग,कचरु चोथे, महादेव पाटेकर,बाळासाहेब आव्हाड , संजय खरड,संदीप खरड,वाय डी कोल्हे, उप अभियंता रमेश शिदोरे,रमेश खेडकर,बंडु रासने,तुषार पुरनाळे,प्रशांत बडे,संभाजी कातकडे, बाळासाहेब देशमुख,महादेव पवार,अमोल सागडे, आदी उपस्थित होते.

      राजळे पुढे म्हणाल्या, येत्या काळात देश व राज्यपातळीवरील ५० हजार किलोमीटर लांबीचे रस्ते पुर्ण करण्यात येणार आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी ४० तलाठी कार्यालयास मंजुरी दिली असल्याने ती कामे देखील लवकरच सुरू करण्यात येतील. मागील महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात भाजपच्या लोकप्रतिनिधीना निधी देताना दुजाभाव केला गेला. नुसत्या घोषणा कारभारामुळे मागील सरकारला सत्तेतुन पायउतार होण्याची वेळ आली.

शिंदे- फडणवीस सरकारमुळे अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना नुकसान भरपाई, नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांना ५० हजार प्रोत्साहन अनुदान वितरीत करण्यात येत आहे. भविष्यात शेतक-यांना शेतीपंपासाठी सौर उर्जा पंप, तालुक्यातील बंद असलेल्या नळपाणी पुरवठा योजनेत सुधारणा, नवीन पाणीयोजनांना मंजूरी यासाठी  विधीमंडळात पाठपुरावा केला जाईल. आगामी काळात कार्यकर्ते व नागरिकांनी अशीच एकजूट ठेवून भाजप सोबत रहावे, असे आवाहन केले.

     कार्यक्रमाप्रसंगी सुखदेव कराड, विष्णुपंत खोसे, बाळासाहेब कराड, सुखदेव कराड, आदिनाथ कराड, रविंद्र डाके, ज्ञानेश्वर कराड, किशोर कराड, बुवासाहेब केकाण, विष्णुपंत गरड, पांडूरंग सांगळे , भगवान गरड, गणेश गरड, आकाश साबळे, डॉ. प्रदीप पाटेकर, गणेश जायभाये, महेश लांडे, बंडू उगले, नंदु  आहेर, बाळासाहेब खोसे, कृष्णा हजारे, उप अभियंता प्रल्हाद पाठक उपस्थित होते.