जेईई मेन्समध्ये श्रीगणेशचे ११ विद्यार्थी पात्र

राहाता प्रतिनिधी, दि. ९ : २०२३ नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांच्या कडून जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या आयआयटी प्रवेश पात्रतेसाठी जेईई परीक्षेचा प्रथम सत्राचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत ‘श्रीगणेश’ च्या साई गवळी ९६.०५, प्रांजल शेटे ९४.६८ ,रिद्धी लहारे ९४.२२ गुण मिळवून या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रथम, द्वितीय, तृतीय येण्याचा मान मिळविला आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा.विजय जनार्दन शेटे यांनी दिली.

     याचबरोबर विराज गोर्डे ८६.६८, सुरज खैरे ८४.४६ , आदित्य मेहेत्रे ८४.३०, सिद्धेश दवंगे ८३.८३, अविष्कार फटांगरे ८१.८४ , अजित चव्हाण ८१.६२, प्रेरणा भामरे ८०.५९ , अमन जैस्वार ८१.०८ गुण मिळवून या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.

या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक विजय शेटे, उपाध्यक्ष संदीप चौधरी, सचिव नेमीचंद लोढा, विश्वस्त कामिनी शेटे, भारत शेटे, रवींद्र चौधरी, सुरेश गमे, देविदास दळवी, महावीर शिंगवी, संदीप सोनिमिंडे,पंकज मुथा, योगेश मूनावत, स्वप्निल लोढा ,चिराग पटेल, आकाश छाजेड, गणेश कुऱ्हाडे यांनी अभिनंदन केले.

        दोन्ही सत्र परीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या गुणांची तुलना करून विद्यार्थ्यांची ऑल इंडिया रँक व श्रेणी गुणवत्ता यादी जाहिर केली जाईल. या सर्व विद्यार्थ्यांना दोन वर्ष सातत्याने श्रीगणेश पॅटर्नअंतर्गत मार्गदर्शन केले गेले. त्याचेच हे यश आहे, असे संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजय शेटे यांनी संगितले.

सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य प्रा. रियाज शेख, उपप्राचार्य प्रा.प्रवीण दहे, प्रा.सागर हिंगे,प्रा.योगेश फटांगरे, प्रा.सुनील गोर्डे,प्रा.नंदलाल आहेर,प्रा. बाजीराव जावळे,मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.बापू पुणेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

श्री गणेश पॅटर्न मुळेच मला हे यश प्राप्त झाले. मी लक्ष्य निर्धारित करून अभ्यास केला. मोबाईल व सोशल मीडिया पासून स्वतःला दूर ठेवले. – साई गवळी (विद्यार्थी)