साईधन अर्बन माल्टिपल निधी फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि. ४ : येथील आखेगाव रस्त्यावरील साईधन अर्बन निधी संस्थेचे कार्यालय काल मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्याने फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र सायरन मोठमोठ्याने वाजू लागल्याने  चोरट्यांनी गॅस कटर आदि साहित्य तेथेच टाकून पलायन केले. यासंदर्भात संस्थेच्या अध्यक्षा मानसी मच्छिंद्र भापकर यांनी शेवगाव पोलिसात तक्रार दाखल केली.

Mypage

    या संदर्भात अधिक माहिती अशी की, काल शुक्रवारी  मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास चोरट्यांनी कार्यालयाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे वायर कट केले आणि त्यानंतर रात्री अडीचला येऊन गॅस कटरच्या साह्याने कार्यालयाचे शटर तोडले. चोरटे आत घुसणार तोच सायरनची यंत्रणा सतर्क झाली. सायरन मोठ्या आवाजात वाजू लागले. त्याची माहिती पोलिसांना  व निधी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. जवळच राहणारे पदाधिकारी पाच मिनिटातच तेथे पोहचले. पोलीसही त्यानंतर आले, मात्र त्या अगोदरच चोरट्यानी गॅस कटर व अन्य साहित्य तिथेच टाकून पळ काढला. 

tml> Mypage