श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाचा शासकीय चित्रकला परीक्षेत १०० टक्के निकाल

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ : कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्फत दरवर्षी घेण्यात येणारी शासकीय रेखाकला( ग्रेड चित्रकला) परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला असुन कोपरगांव शहरांतील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाचा निकाल १००% लागला आहे. शाळेतील इलेमेंटरी ग्रेड चित्रकला परीक्षेत २७विदयार्थी सहभागी झाले होते. या मध्ये प्रथम श्रेणीत ५विदयार्थी, व्दीतीय श्रेणीमध्ये ४ तर तृतीय श्रेणीमध्ये १८विदयार्थी उत्तीर्ण झाले.

इंटरमिजिएट परीक्षेमध्ये एकुण २२विदयार्थी सहभागी झाले  त्यात प्रथम श्रेणीमध्ये ९ व्दीतीय श्रेणीमध्ये१ तर तृतीय श्रेणीमध्ये १२ उत्तीर्ण झाले.या सर्व यशस्वी विद्यार्थीना  कलाशिक्षक श्री.अनिल अमृतकर, श्री.अतुल कोताडे व सौ.शितल अजमेरे यांनी मार्गदर्शन केले. 

या सर्व यशस्वी विदयार्थीचे संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे सचिव दीलीप अजमेरे, सहसचिव सचिन अजमेरे, स्थानिक स्कुल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, अमोल अजमेरे, संदीप अजमेरे ,विदयालयांचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर   उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड, पर्यवेक्षिका श्रीमती उमा रायते यांनी अभिनंदन केले आहे.

या शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या  विदयार्थीना या वर्षीच्या शालांत माध्यमिक परीक्षा मंडळ यांच्यामार्फत अ श्रेणी मिळविणा-यांना ७ गुण व ब श्रेणी मिळविणा-या ५ गुण तर क श्रेणी मिळविणा-यांना ३गुण इतके वाढीव गुण मिळणार आहेत, अशी माहीती मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी दिली.