राज्याच्या पशुसंवर्धन विभागातील ४४६ रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु 

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २७ : महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन विभागातील सुमारे ४४६ जागांसाठी पदभरती प्रक्रिया दि. २७ मे पासून सुरु झाली असून ही ऑनलाईन पध्दतीची प्रक्रिया दि. ११ जून २०२३ पर्यंत सुरु राहणार आहे. राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासाठी सातत्याने बैठका घेऊन शासनस्तरावर पाठपुरावा केला आहे.

गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली ही पदभरती होणार असल्याने भरतीपात्र युवकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. या पदभरतीचा इच्छूक व पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे पाटील यांनी केले.

पशुसंवर्धन विभागाची बहुप्रतिक्षीत पदभरती नुकतीच जाहीर झालेली आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पशुसंवर्धन विभागातील सरळसेवा कोट्यातील रिक्त पदे भरण्याबाबत भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील पदे भरण्यात येणार आहेत. त्यात पशुधन पर्यवेक्षक ३७६ पदे, वरिष्ठ लिपीक ४४ पदे, लघुलेखक ( उच्चश्रेणी ) २ पदे, लघुलेखक (निम्नश्रेणी) १३ पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ४ पदे, तारतंत्री ३ पदे, यांत्रिकी २ पदे, बाष्पक परिचर २ पदे अशा एकूण ४४६ जागा भरावयाच्या आहेत.

या भरती प्रक्रियेला दि. २७ मे पासून सुरुवात झाली असून दि. ११ जून २०२३ पर्यंत ही भरती प्रक्रिया सुरु राहील. तर साधारणतः जुलै महिन्यात परीक्षा घेण्याचे नियोजन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आलेले आहे. बेरोजगारांना लोकसेवक म्हणून शासनसेवेत काम करण्याची संधी मिळावी आणि कमी मनुष्यबळामुळे कुठल्याही पशुवैद्यकीय सेवा विस्कळीत होऊ नये यासाठी महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सातत्याने पाठपुराव केला. त्या पाठपुराव्याला यश आले असून यामुळे पशुसंवर्धन विभागातील कामकाजाला गती मिळणार आहे.

सुमारे ४४६ जागांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावयाची सुविधा https://ibpsonline.ibps.in/cahmay23/ या संककेतस्थळावर  उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. पशुसंवर्धन विभागाची ही भरती प्रकिया संपूर्णतः पारदर्शक पध्दतीने पार पाड