मराठी भाषा व संस्कृतीचे संवर्धन व्हायला हवे – न्या. जागूष्टे

शेवगाव प्रतिनिधी, दि. २७ :  मराठी भाषेचा गोडवा काही न्याराच, अद्वितीय असा आहे. मराठी भाषेसारखी समृद्ध भाषा अन्य दुसरी नाही. म्हणून मराठी भाषेचे आणि मराठी संस्कृतीचे संवर्धन करणे आपणा सर्वांचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन शेवगावच्या  दिवाणी न्यायाधीश श्रीमती संजना जागुष्टे यांनी केले आहे.

       तालुका विधी सेवा समिती आणि तालुका वकील संघ शेवगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज सोमवारी न्यायालयाच्या प्रांगणात आयोजित ‘मराठी राजभाषा ‘ दिनाच्या कार्यक्रमात त्या अध्यक्ष पदावरून बोलत होत्या.

     न्यायाधीश जागुष्टे म्हणाल्या ,राष्ट्रपतींना राजभाषेचा दर्जा देण्याचा घटना प्राप्त अधिकार आहे. २१ जानेवारी २०२३ ला महाराष्ट्र सरकारच्या निर्देशानुसार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ मराठी साहित्यिक, कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ,त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून २७ फेब्रुवारी ‘मराठी राजभाषा दिन ‘ म्हणून सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात  येत आहे. असे सांगून शेवटी त्यांनी, ‘ फक्त लढ म्हणा ‘ ही कवी कुसुमग्रजाची कविता गाऊन त्यांना विनम्र अभिवादन केले.

    अॅड. हरिभाऊ गाडेकर म्हणाले, मराठी भाषेचा दैनंदिन कामकाजात वापर व्हायला हवा. तसेच विविध ठिकाणचे प्रसिद्धी फलक देखील मराठी भाषेत हवेत. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी त्याची आवश्यकता आहे. यावेळी न्यायालयीन कर्मचारी अण्णासाहेब बोडखे यांनी स्वतःची ‘ मायबाप ‘ ही कविता गाऊन कुसुमाग्रजांना आदरांजली वाहिली.

      यावेळी सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती व्ही.बी.डोंबे, दुसरे सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती एम. ए .बेंद्रे,
बारासोसिएशनचे अध्यक्ष अॅड.के .के. गलांडे, अॅड.  शैलेंद्र भारदे ,  अॅड. लक्ष्मणराव लांडे , अॅड.मिनीनाथ देहाडराय, अॅड चव्हाण, अॅड अभिजीत काकडे, अॅड निकाळजे, सुधीर काकडे उपस्थित होते. अॅड. अतुल लबडे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.