शेवगावात संभाजी भिडे यांचा निषेध

Mypage

बेताल वक्तव्याबाबत अटकेची मागणी

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३१ : संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, महापुरुष महात्मा ज्योतिराव, सावित्रीबाई फुले, पंडित जवाहरलाल नेहरू तसेच साईबाबा यांचे विषयी केलेल्या अक्षेपार्ह विधानाचा शेवगाव तालुका भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे राज्य सचिव अ‍ॅड. कॉ. सुभाष लांडे, जिल्हा सह सेक्रेटरी कॉ. संजय नांगरे याच्या नेतृत्वा खाली येथील क्रांती चौकात तब्बल तासभर तीव्र निदर्शने केली.

tml> Mypage

पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात मोर्चाने जाऊन परिक्षाविधिन पोलिस अधिकारी बी. चंद्रकांत रेड्डी यांना देशाच्या संविधान विरोधी बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांचेवर कठोर कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी. या मागणीचे निवेदन दिले. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते कॉ. बापूराव राशिनकर, तालुका सेक्रेटरी कॉ. सदिप इथापे, कॉ. वैभव शिदे, कॉ. बाळासाहेब म्हस्के आदि कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

Mypage