वकीलांच्या मदतीशिवाय न्याय देणे अशक्य – जिल्हा न्यायाधिश कोऱ्हाळे

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३१ : न्यायालयात चालु असलेल्या खटल्यात वादी-प्रतीवादी किंवा फिर्यादी व आरोपीच्या वकीलाशिवाय न्यायाधिश न्यायदान करू शकत नाही तर वकीलांच्या मदतीनेच न्यायाधिश न्याय देेवु शकतात, असे उद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.बी. कोऱ्हाळे यांनी काढले. कोपारगाव वाकील संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अ‍ॅड. एम.पी. येवले यांच्या अध्यक्षीय पदग्रहण संमारंभात ते बोलत होते.

Mypage

 यावेळी व्यासपिठावर मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस.एस. बोस, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एम. ए. शिलार, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर बी.डी. पंडीत, माजी अध्यक्ष अ‍ॅड. एस.पी. खामकर, नवनिर्वाचित अध्यक्ष अ‍ॅड. एम.पी. येवले, नवनिर्वाचित उपाध्यक्ष अ‍ॅड. एस.डी. गव्हाणे, नवनिर्वाचित महिला उपाध्यक्ष अ‍ॅड. ज्योती भुसे, नवनिर्वाचित सचिव अ‍ॅड. दिपक पवार उपस्थित होते.

Mypage

 न्यायाधिश कोऱ्हाळे पुढे म्हणाले की, खटल्यामध्ये वकीलांकडुन खरी माहीती, पुरावे न्यायाधिशापर्यंत पोहचले तरच न्याय होतो. न्याय संस्थेवरील नागरीकांचा विश्वास दृढ होण्यासाठी न्यायाधिश व वकीलांनी काम करणे गरजेचे आहे. परंतु प्रलंबित खटले आणि न्यायाधीशांची संख्या पाहता वेळेत न्याय होत नसल्याची खंती त्यांनी यावेळी व्यक्त केली. माजी अधक्ष अ‍ॅड. एस.पी. खामकर यांनी त्यांच्या काळात योग्य कामकाज केले. नुतन अध्यक्ष अ‍ॅड. एम.पी. येवले यांना काम करण्यासाठी भरपुर संधी आहे. नवीन न्यायालय ईमारत चांगली कशी होईल याकडे नुतन अध्यक्षांनी लक्ष घालुन पुर्ण करून घ्यावी असे म्हणत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

Mypage

 दरम्यान जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील म्हणाले, वकीलसंघ कसा असतो हे मला कोपरगावच्या अॅडव्होकेट बारमध्ये आल्यावर कळाले, ज्युनिअर वकिलांना कोर्ट कामकाजाची जलदगतीने माहिती व्हावी, त्यांच्यात स्टेज डेअरींग निर्माण होण्यासाठी वकील संघात लेक्चर सेरिज सुरू करण्याची विनंती करून नुतन कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या. 

Mypage

यावेळी प्रास्ताविक माजी अध्यक्ष एस.पी. खामकर यांनी केले. ते म्हणाले की, अध्यक्षपद केवळ सन्मानासाठी नसुन ती जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडतांना त्रास देखिल सहन करावा लागतो. माझ्या काळात न्यायिक अधिकारी आणि वकील संघाचे वातावरण खेळते ठवेले त्यामुळे काम करणे सोपे झाले. तुम्ही ही या पदाला योग्य न्याय द्याल असे म्हणत आपला पदभार नुतन अध्यक्षांकडे सोपवुन भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. 

Mypage

सत्काराला उत्तर देतांना नुतन अध्यक्ष अ‍ॅड. येवले म्हणाले की, कोपरगावच्या वैभवशाली वकील संघाच्या अध्यक्षपदी माझी निवड झाली हे मी माझे भाग्य समजतो. न्यायदेवतेचे मतपरीवर्तन करणारा म्हणजे वकील तेंव्हा बार आणि बेंचचे संबध कसे सलोख्याचे राहतील यासाठी वकील संघाच्या सदस्यांना विश्वासात घेवुन काम करेल. मिळालेल्या पदाला योग्य न्याय देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Mypage

दरम्यान दिवाणी न्यायाधिश एम.ए. शिलार, अ‍ॅड. व्ही.जी. सदाफळ, अ‍ॅड. पी.एम. गुजराथी, अ‍ॅड. अशोक टुपके, अ‍ॅड. जयंत जोशी, अ‍ॅड. एस.एम. वाघ, अ‍ॅड.एस.डी. कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. यावेळी, जेष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. आर.टी. भवर, अ‍ॅड. सी.एम. वाबळे, अ‍ॅड. एस.व्ही. देव, अ‍ॅड. भास्कर गंगावणे, अ‍ॅड. शंतनु धोर्डे, यांचेसह अनेक सिनिअर, ज्युनिअर वकील, आप्तेष्ट, नातेवाईक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ॲड. रंजीत जावळे, ॲड. राहुल जावळे यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन अ‍ॅड. महेश भिडे यांनी केले, तर नवनिर्वाचित उपाध्यक्ष अ‍ॅड. एस.डी. गव्हाणे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *