अवैध गौण खनिज वाहतूक चालकावर शेवगाव पोलीसाची कारवाई

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३० : शेवगाव पोलिस पथक रात्रीची गस्त घालत असतांना पहाटेच्या वेळी शहराच्या क्रांती चौकात मुरुम असलेला विना क्रमांकाचा डंपर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यात असलेला ३ ब्रास मुरुम जप्त केला असून सदर वाहन पुढील कारवाई साठी तहसिल कार्यालयाच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलिस ठाण्यातून देण्यात आली.

Mypage

पोलिस पथकाने ताब्यात घेतलेल्या डंपर चालकाचे नाव आन्सार रशिद पठाण रा. खामगाव ता. शेवगाव असे असून उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील, परिक्षाविधीन पोलिस अधिकारी बी.चंद्रकांत रेड्डी यांचे र्मादशनाखाली सपोनि आशिष शेळके यांनी ही कारवाई केली आहे. 

Mypage