डिजिटल युगात मैदानी खेळ गरजेचे – संदीप मिटके

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : महाराष्ट्र राज्य टेनिस हॉलीबॉल असोशिएशन व अहमदनगर जिल्हा टेनिस हॉलीबॉल असोशिएशनच्या संयुक्त विदयमाने २५ वी राज्य टेनिस हॉलीबॉल सब ज्युनिअर व ज्युनिअर स्पर्धा शिर्डी येथे नुकतीच पार पडली. या स्पर्धेचे उदघाटन शिर्डी येथिल डी.वाय एस.पी. संदीप मिटके यांचे शुभहस्ते संपन्न झाले. त्या प्रसंगी त्यांनी खेळाडुंना मार्गदर्शन केले.

संदीप मिटके म्हणाले की, आजच्या मोबाईल व डीजिटल तंत्रज्ञानाच्या युगात अशा स्पर्धा आयोजित करणे गरजेचे आहे. आजकाल मुले ही मैदानापासुन दुर जात आहे. त्यामुळे त्यांना मैदानावर आकर्षित करण्यासाठी अशा स्पर्धा महत्वाच्या आहेत. यावेळी महाराष्ट्र राज्यातुन १८ जिल्ह्यातील २०० खेळाडूंसह ५० प्रशिक्षक स्पर्धात सहभागी झाले.

या  स्पर्धेच्या उदघाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी टेनिस हॉलीबॉल फेडरेशनचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार विजेते आनंद खरे उपस्थित होते. महाराष्ट्र टेनिस हॉलीबॉलचे सचिव गणेश माळवे यांनी या खेळाचे जनक प्रा. व्यंकटेश वांगवाड यांची ओळख करुन देत टेनिस हॉलीबॉल या खेळाची व्याप्ती सांगितली.

टेनिस हा खेळ शालेय स्पर्धेत सामाविष्ट झाला असुन डिसेंबरपासून राज्यस्तरीय स्पर्धेला सुरवात होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अहमदनगर जिल्हा टेनिस हॉलीबॉलचे असोशिएशनचे अध्यक्ष मकरंद को-हाळकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राष्ट्रीय हॉलीबॉल प्रशिक्षक राजेंद्र कोहकडे यांनी केले.

या प्रसंगी टेनिस हॉलीबॉल असोशिएशनचे उपाध्यक्ष आबा शिरसाठ, राज्य कोषाध्यक्ष डॉ. दिनेश शिंगारम, तांत्रिक समितेचे चेअरमन प्रफुल्ल बन्सोड, रेफरी बोर्डाचे सचिव सतिश नावाडे, मुंबई विभागिय सचिव अशोक शिंदे, विविध जिल्हा सचिव देवानंद नेमाणे (बुलढाणा), शाम भोसले (पुणे शहर), रामेश्वर राठोड (अकोले), नावेद पठाण (हींगोली), तेजस पाटील (मुंबई उपनगर), शेख खमर (बीड) प्रमोद महाजन (संभाजीनगर) जिल्हा असोशिएशनचे सदस्य निलेश बडजाते, रिजवान पठाण आदि उपस्थित होते. अहमदनगर जिल्हा टेनिस हॉलीबॉलचे सचिव शिवराज पाळणे यांनी आभार मानले. या स्पर्धेला शिर्डीतील क्रीडाप्रेमी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.